पुणे पायाभूत सुविधा : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; NH-48 वर गर्दी कमी करण्यासाठी 3 भुयारी मार्ग मंजूर
Marathi June 03, 2026 09:25 AM

पुणे पायाभूत सुविधा | मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर तासनतास वाहतूक कोंडीत अडकलेल्या लाखो वाहनधारकांसाठी आता आशेचा किरण आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी NH-48 वर तीन नवीन बॉक्स-स्ट्रक्चर सबवे बांधण्यास हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे ताथवडे, पुनावळे, वाकड, किवळे, मामुर्डी परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पुण्यात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पिंपरी-चिंचवडच्या पश्चिम भागात गेल्या काही वर्षांत झपाट्याने नागरीकरण होत आहे. आयटी पार्क, गृहनिर्माण प्रकल्प आणि वाढती लोकसंख्या यामुळे NH-48 वरील रहदारी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ वाहनांच्या लांबच लांब रांगा ही रोजची समस्या बनली होती. पुणे पायाभूत सुविधा

या पार्श्वभूमीवर नवीन तीन भुयारी मार्गांसह ताथवडे व पुनवळे येथील सध्याच्या भुयारी मार्गाच्या रुंदीकरणालाही मान्यता देण्यात आली आहे. तसेच वाकड, ताथवडे, पुनावळे भागातील प्रलंबित सर्व्हिस रोडची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

याबाबत चिंचवडचे आमदार शंकर जगताप म्हणाले की, सयाजी, भूमकर चौक, किवळे जंक्शन, पवना नदी मार्ग, मामुर्डी परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अनेक उपाययोजना सुचविल्या आहेत. या सर्व कामांना केंद्र सरकारने उच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिल्यामुळे आता या प्रकल्पांना गती मिळण्याची शक्यता आहे. पुणे पायाभूत सुविधा

विशेष म्हणजे हा संपूर्ण भाग मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील सर्वात वर्दळीचा भाग मानला जातो. या रस्त्यावर स्थानिक वाहतूक आणि अवजड माल वाहतूक या दोन्हींचा ताण पडतो. त्यामुळे, नवीन भुयारी मार्ग आणि विस्तारित सेवा रस्त्यांच्या पूर्ततेमुळे प्रवासाच्या वेळेत लक्षणीय घट होईल, हजारो नागरिकांसाठी दैनंदिन प्रवास जलद आणि सुरक्षित होईल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.