Nashik Accident News : नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे अपघाताची विचित्र घटना घडली आहे. यात मुंबई - आग्रा महामार्गावर (Mumbai Aagra Bus Accident) सायंकाळच्या सुमारास एक मोठा अपघात घडलाय. राहुड घाट उतरत असताना अचानक क्रेनचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव जाणाऱ्या क्रेनने समोरील चार वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण दुर्घटनेत एका कारमधील एका लहान मुलासह दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर क्रेनने आयशर गाडी, कार, आपे रिक्षा यांना धडक दिली. तर आपे रिक्षा क्रेनच्या पुढील भागात अडकून तिचा चक्काचूर झाला.
दरम्यान, अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी रिक्षामध्ये अडकलेल्या दोघांना बाहेर काढले. अपघातानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या अपघाताच्या घटनेचा अधिक तपास चांदवड पोलीस करीत आहे. मात्र या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Surat Bardoli Highway Accident : सुरत-धुळे राष्ट्रीय महामार्गावर दोन बसचा भीषण अपघात
दरम्यान, सुरत-धुळे राष्ट्रीय महामार्गावर बाडोली तालुक्यातील उवा गावाजवळ दोन बसच्या झालेल्या भीषण अपघाताने सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. या भीषण अपघातात सात प्रवाशांचा मृत्यू झाला असून अपघातानंतर जामनेर सुरत बसने पेट घेतला. या आगीत होरपळुन सात प्रवाशांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, आगीत जळालेल्या मृतगेहांची ओळख पटवण्यासाठी मृतदेहांचे डीएनए नमुने घेण्यात आले आहे. आता या अपघातानंतर रुग्णालय परिसरात जखमी रुग्णांच्या नातेवाईकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. अपघातात होरपळलेल्या प्रवाशांपैकी सात जणांचा मृत्यू झाला असून, यातील सहा मृतदेह घटनास्थळावरून ताब्यात घेऊन ते अत्यंत काळजीपूर्वक बार्डोलीच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जळगाव बसस्थानकावर ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटी बसच्या वेळापत्रकातील अनियमिततेमुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. सायंकाळी 7.30 वाजता सुटणारी जळगाव-रवंजा बस तब्बल चार तास उलटल्यानंतरही न आल्याने प्रवाशांना बसस्थानकावर ताटकळत थांबावे लागले. बसची प्रतीक्षा करत असलेल्या प्रवाशांमध्ये वृद्ध महिला, विद्यार्थिनी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश असून रात्री उशिरापर्यंत बसस्थानकावर अडकून पडल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. एसटी प्रशासनाकडून बस उशिराबाबत स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी नियमित आणि वेळेवर बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.