सोलापूर कल्याण दरम्यान धावणाऱ्या सिद्धेश्वर एक्स्प्रेस मध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या दागिने चोरीप्रकरणी कल्याण रेल्वे गुन्हे शाखेला आणखी एक यश मिळाले आहे. या प्रकरणातील दहा आरोपींपैकी तीन आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली होती. आता पोलिसांनी पुणेकर उर्फ शिवया डिकोले याला अटक केली आहे. त्याच्याकडून एक कोटी 27 लाखांचे बिस्किट जप करण्यात आले आहे. एक व्यवसायिक आपल्या मुलीसोबत दागिने विक्री करण्यासाठी सोलापूरला गेले होते दागिने घेऊन मुंबईला येत असताना सहा महिन्यापूर्वी हा प्रकार घडला होता.
Maharashtra News Live Update: विधानपरिषद निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवसपुण्यात महायुतीकडून विक्रम काकडे तर महाविकास आघाडीकडून श्रीकांत पाटील यांना उमेदवारी
भाजपमधून बंडखोरी करत प्रदीप कंद यांनी भरला आहे अपक्ष अर्ज
पुणे विधान परिषदेचे जागा बिनविरोध होणार का याकडे सर्वांचे लक्ष
अपक्ष उमेदवार प्रदीप कंद माघार घेण्याची शक्यता
Maharashtra News Live Update: नंदुरबारमध्ये स्टेट बँकेसमोर कॅश व्हॅनच्या सुरक्षा रक्षकाचा गोळीबारनंदुरबार शहरातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेजवळ बुधवारी सायंकाळी कॅश व्हॅनमधून रोकड उतरवत असताना सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून अचानक मिस फायर झाल्याची धक्कादायक घटना घडली. गोळी थेट फरशीवर आदळल्याने फरशीचे तुकडे उडाले. या दुर्घटनेत 43 वर्षीय संजय गायकवाड हे जखमी झाले असून, त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे व भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. गेल्या दोन आठवड्यांत जिल्ह्यात घडलेल्या बंदुकीच्या दोन घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.