Latest Marathi News Live Update : विधानपरिषद निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस
esakal June 04, 2026 12:45 PM
Legislative Council Elections : विधानपरिषद निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस

पुण्यात महायुतीकडून विक्रम काकडे तर महाविकास आघाडीकडून श्रीकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. भाजपमधून बंडखोरी करत प्रदीप कंद यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. पुणे विधान परिषदेची जागा बिनविरोध होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अपक्ष उमेदवार प्रदीप कंद माघार घेण्याची शक्यता आहे.

Nashik Legislative Council Election : नाशिक विधानपरिषद निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस

- नाशिक विधानपरिषद निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस

- भाजपचे गणेश गीते, त्यांचे बंधू गोकुळ गीते आणि राष्ट्रवादीचे गोरख बोडके यांनी दाखल केलेले अर्ज कायम असल्यानं शिंदेसेनेची चिंता वाढली

- गणेश गीते, गोकुळ गीते आणि गोरख बोडके आज उमेदवारी मागे घेतात का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

- काल गणेश गीते यांनी मुंबईत जाऊन गिरीश महाजन यांची घेतली होती भेट

- तर दुसरीकडे काल उदय सामंत आणि गोरख बोडके यांच्यातही झालीय चर्चा

- गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची माहिती

- दुपारपर्यंत होणाऱ्या घडामोडींवर अनेक राजकीय समीकरणे अवलंबून

- तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यास शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विजयाचा मार्ग होणार मोकळा

- त्यामुळे आजचा दिवस नाशिकच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी निर्णायक ठरणार

Aniket Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा विधान परिषदेत जाण्याचा मार्ग मोकळा

अलिबाग : रायगड- रत्नागिरी- सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत वाद अखेर निवळला. शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या मुलगी जुईली दळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांच्या विधान परिषदेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जागावाटपात हा मतदारसंघ ‘राष्ट्रवादी’च्या वाट्याला आला. त्यानुसार पक्षाने अनिकेत तटकरे यांना उमेदवारी जाहीर केली होती; मात्र जुईली दळवी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्याने, काही स्थानिक नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याने राजकीय वातावरण तापले होते.

Koyna Dam Water : कोयनेतून १०५० क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग

पाटण : कोयना धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने पश्चिमेकडील वीजनिर्मिती व पूर्वेकडील सिंचनासाठी पाण्याचा वापर बंद केला आहे. बुधवारी दुपारी सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात पिण्यासाठी पायथा विद्युतगृहातून १०५० क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग केला.

Nagpur Municipal Corporation : नागपूर महानगर पालिका लोकसहभागातून 5 लाख वृक्षारोपणाची मोहीम राबविणार

- नागपूर महानगर पालिका लोकसहभागातून 5 लाख वृक्षारोपणाची मोहीम राबविणार

- महापौर नीता ठाकरे यांची माहिती

- व्यापक मोहिमेचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 5 जूनला करणार शुभारंभ

- नागपूर महानगरपालिकातर्फे शहरातील पर्यावरण संवर्धनासाठी शहरात लोकसहभागातून येत्या वर्षभरात 5 लाख रोपट्यांचे वृक्षारोपण करण्याची महत्वाकांक्षी मोहिम राबविली जाणार

- या महाउपक्रमाचा शुभांरभ केंद्रीय परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते येत्या 5 जूनला सुयोगनगर येथील उद्यानातून सकाळी 10 वाजता होणार आहे.

Sindhudurg Rain : मॉन्सूनपूर्व पावसाची सिंधुदुर्ग जिल्ह्यात दमदार हजेरी; उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा

वैभववाडी : मॉन्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात आज दमदार हजेरी लावली. कुडाळ, कणकवली, वैभववाडी आणि देवगड तालुक्याच्या बहुतांशी भागात जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे वातावरणात मोठा गारवा निर्माण होऊन उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला. काल रात्री उशिरा जिल्ह्याच्या बहुतांशी भागात सरी कोसळल्या. कणकवली, वैभववाडी आणि कुडाळ तालुक्याच्या काही भागात जोरदार, तर उर्वरित भागात हलक्या सरी झाल्या. दरम्यान, आज पहाटेपासून थंड वारे वाहण्यास सुरुवात झाली.

Mumbai News : मलबार हिल भागात ‘मराठी विरुद्ध जैन-गुजराती’ नामफलकाचा वाद पुन्हा उफाळण्याची चिन्हे

Latest Marathi Live Updates 04 June 2026 : दक्षिण मुंबईतील संवेदनशील परिसर असलेल्या मलबार हिल भागात ‘मराठी विरुद्ध जैन-गुजराती’ नामफलकाचा वाद पुन्हा उफाळण्याची चिन्हे आहेत. येथील एका क्रीडांगण आणि चौकात गुजराती भाषेतील नामफलक लावल्याचा आरोप करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. याशिवाय देश-राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, वाहतूक कोंडी, राजकीय हालचाली, क्रीडा, मनोरंजन आणि मान्सूनविषयक अपडेट्स यांची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.