Jodhpur Social Media Influencer Anita Bishnoi: सोशल मीडियाचं (Social Media) जग जेवढं ग्लॅमरस आणि हवंहवंसं वाटतं, तेवढीच त्याची दुसरी बाजू फारच हादरवून सोडणारी आहे. राजस्थानमधील जोधपूर (Jodhpur) इथून सोशल मीडियाच्या झगमगाटामागे दडलेला मानसिक ताण आणि ट्रोलिंगचा गंभीर परिणाम समोर आणणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर (Social Media Influencer) अनीता बिश्नोई (Anita Bishnoi) यांनी ट्रोलिंगला कंटाळून विष घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हादरवणारी बाब म्हणजे, अनीता बिश्नोई यांनी त्यांना होणाऱ्या ट्रोलिंगला कंटाळून रडत रडत एक लाईव्ह केलेलं. या लाईव्हमध्येच त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आणि त्यानंतर विष प्यायलं. मीडिया रिपोर्टनुसार, विष घेतल्यानंतर अनीता बिश्नोई यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अनीता बिश्नोई यांना गेल्या काही दिवसांपासून एका ड्रेसमउळे ट्रोल करण्यात आलं होतं, ज्यामुळे त्यांच्यावरचा दबाव फारच वाढला होता. अनेकांनी त्यांना ट्रोल केलेलं. तर त्यांच्या व्हिडीओवरुन त्यांना रोस्ट केलेलं. ट्रोलिंग आणि सातत्यानं रोस्ट केलं जात असल्यामुळेच अनीता बिश्नोई यांनी लाईव्ह व्हिडीओमध्येच कथितरित्या विष प्यायल्याचं बोललं जात आहे.
प्रकरण नेमकं काय? (Social Media Influencer Anita Bishnoi Trolling)
मिळालेल्या माहितीनुसार, अनीता बिश्नोई यांची एक सोशल मीडिया पोस्ट काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. "कपडे छोटे झाले तर, लाज कुठून येणार?", या आशयाच्या पोस्टमुळे त्यांना एका बाजूला पाठिंबा मिळाला, तर दुसऱ्या बाजूला तीव्र टीका आणि ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं. अनेक सोशल मीडिया युजर्सनी त्यांच्या पोस्टवर आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिल्या, तर काहींनी त्यांना लक्ष्य करत सतत टीका करण्यास सुरुवात केली.
आपल्या व्हिडीओवरुन होणाऱ्या ट्रोलिंगमुळे अनीता बिश्नोई मानसिकदृष्ट्या खूपच खचल्या, असं सांगितलं जातंय. दरम्यान, त्यांनी सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्टही शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी, "आता तुमची बहीण तुमच्यासोबत राहणार नाही...", असं त्यांनी म्हटलेलं. त्यानंतर काही वेळातच त्यांनी विषारी पदार्थ सेवन केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावरील ट्रोलिंग, मानसिक आरोग्य आणि ऑनलाईन छळ यांसारख्या विषयांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या प्रकरणातील सर्व परिस्थिती आणि कारणांबाबत अधिकृत तपास सुरू असून, अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
अनीता बिश्नोई यांच्यावर उपचार सुरू (Influencer Anita Bishnoi Poison Consumption After Trolling)
अनीता बिश्नोई यांनी कथितरित्या विष प्यायल्याचं लक्षात येताच, कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात घेऊन गेले. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. च्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असून, अनेक लोक त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. या घटनेमुळे सोशल मीडियावरील 'ट्रोलिंग' आणि 'सायबरबुलिंग'च्या गंभीर परिणामांचं वास्तव पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. तज्ज्ञांच्या मते, ऑनलाईन होणारी टीका आणि अवमानकारक टिप्पण्यांचा व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर अनेकदा अत्यंत खोलवर परिणाम होत असतो. या संदर्भात, सोशल मीडियावर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करतानाच, संवेदनशीलता आणि जबाबदारी बाळगणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे.
ABP माझाच्या बातम्या LIVE...