Shilpa Shinde Net Worth: अभिनेत्री शिल्पा शिंदे ही नेहमी काही ना काही कारणाने चर्चेत असते.आता तिने नुकताच असा मोठा खुलासा केला की ‘भाबीजी घर पर हैं’ च्या प्रोड्युसरवर खोटे आरोप लावले होते. या खुलाशानंतर ती प्रकाशझोतात आली असून तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. मात्र, ट्रोलिंगमुळे आपल्याला काही फरक पडत नाही, असं शिल्पाचं म्हणणं आहे. शिल्पा शिंदाची एकूण संपत्ती अंदाजे 33 कोटी रुपये आहे आणि एवढी संपत्ती असूनही, या अभिनेत्रीला साधेपणाने आयुष्य जगायला आवडतं. (All Photos : Social Media)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिल्पा शिंदेची एकूण संपत्ती 18 ते 33 कोटींच्या दरम्यान आहे. अभिनयाव्यतिरिक्त, शिल्पा शिंदे रिॲलिटी शोज आणि ब्रँड एंडोर्समेंटमधूनही चांगली कमाई करते. ती ‘बिग बॉस 11’ या सीझनची विजेती देखील होती, ज्यासाठी तिला मोठी रक्कम मिळाली होती.
शिल्पा शिंदे ‘भाभीजी घर पर हैं’ 2.0 फ्रँचायझीमध्ये परतली असून, तिने अंगूरी भाभीची भूमिकेत नवे प्राण फुंकले आहेत. मालिकेत परतल्यापासून शिल्पा शिंदे प्रत्येक भागासाठी 70 हजार रुपये मानधन घेते.
‘बिग बॉस 1’ जिंकल्यानंतर शिल्पा शिंदेला बक्षीस म्हणून 44 लाख रुपये मिळाले. सलमान खानच्या या शोमध्ये ती आठवड्याला अंदाजे 6 ते 7 लाख रुपये कमवत होती. बिग बॉस व्यतिरिक्त, शिल्पा शिंदे ‘खतरों के खिलाडी 14’ आणि ‘झलक दिखला जा 10’ यांसारख्या मोठ्या रिॲलिटी शोमध्येही झळकली होती.