जगभरात शांतता, सद्भावना आणि मानवी एकतेचा संदेश प्रसारित करणाऱ्या अबू धाबी येथील BAPS हिंदू मंदिराला “Tolerance Award 2026” ने सन्मानित करण्यात आलं. International Dialogue of Civilizations and Tolerance Conference (IDCT 2026) दरम्यान हा सन्मान प्रदान करण्यात आला. जागतिक स्तरावर सहिष्णुता, संवाद आणि शांततापूर्ण सहअस्तित्वाला प्रोत्साहन देणाऱ्या संस्थांना हा पुरस्कार दिला जातो.
हा पुरस्कार केवळ एका संस्थेचा गौरव नसून, BAPS हिंदू मंदिर समाजात सातत्याने रुजवत असलेल्या मानवता, करुणा, एकता आणि परस्पर सन्मान या सार्वत्रिक मूल्यांची दखल आहे. Festival of Harmony, Omsiyyat तसेच विविध मानवतावादी मदत अभियानांद्वारे मंदिराने विविध धर्म, संस्कृती आणि राष्ट्रीयतेतील लोकांना एकाच व्यासपीठावर आणून विश्वबंधुत्वाचे प्रेरणादायी उदाहरण निर्माण केलं आहे.
भारतीय संस्कृतीतील ‘मातृदेवो भव’, ‘पितृदेवो भव’ आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’ या शाश्वत मूल्यांचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की, ‘ मजबूत कुटुंबे ही मजबूत समाज आणि समृद्ध राष्ट्राची पायाभरणी असतात’. परम पूज्य प्रमुखस्वामी महाराजांनी प्रेरित केलेल्या ‘घर सभा’ या परंपरेचं त्यांनी आधुनिक काळातील एक प्रभावी सामाजिक गरज म्हणून वर्णन केलं. या उपक्रमात कुटुंबातील सदस्य दररोज काही वेळ एकत्र बसून प्रार्थना, संवाद आणि आत्मीयतेचा अनुभव घेतात.