FIFA World Cup: "जिंका किंवा मरा!" मुसोलिनीच्या एका धमकीने कसं बदललं फुटबॉलचं मैदान? शेवटी जे घडलं ते वाचून अंगावर काटा येईल!
esakal June 04, 2026 07:45 PM

प्रसाद सोवनी

आपण अगदी सामान्य राहणीमान असलेली व्यक्ती आहोत आणि लोकांपैकीच एक आहोत, हे दाखवण्यासाठी इटलीचे हुकूमशहा बेनितो मुसोलिनी उद्‌घाटनाच्या सामन्याचे तिकीट खरेदी करण्यासाठी रांगेत उभे राहिले.

छायाचित्रे झळकली, प्रसिद्धी मिळाली आणि मग मात्र ते व्हीआयपी बॉक्समध्ये जाऊन बसले. युरोपातील देशांनी उरुग्वेमधील पहिल्या स्पर्धेवर बहिष्कार घातला होता त्याचा निषेध म्हणून उरुग्वेने या स्पर्धेवर बहिष्कार घातला. उद्घाटनाच्या दिवशी त्यांनी मुद्दाम आठ सामने एकाच वेळी वेगवेगळीकडे ठेवले, त्यातून त्यांना हे सिद्ध करायचे होते, की आमचे व्यवस्थापन किती सरस आहे.

CSK vs SRH Live: संजू सॅमसन 'फसला', उर्विल पटेलचा आडवा फटका हुकला... पॅट कमिन्सच्या डावपेचांनी चेन्नईला 'पॉवर' दाखवली... Video मुसोलिनीची धमकी

अंतिम सामन्याच्या अगोदर मुसोलिनीने इटालियन खेळाडूंना कथितरीत्या ‘विंचेरे ओ मोरिरे’ (जिंका किंवा मरा) असा धमकीदायक संदेश पाठवला होता. खेळाडू जिंकले, २-१ ने अतिरिक्त वेळेत. इटलीने करंडक जिंकल्यावर फिफाच्या ज्यूल्स रिमे ट्रॉफीबरोबरच त्यांनी स्वतःची प्रचंड मोठी अशी खास बनवून घेतलेली ट्रॉफीही दिली. दुसऱ्या ट्रॉफीपेक्षा सहा पट मोठी! त्याचे नाव ठेवले ‘ज्येष्ठ नेत्याचा चषक’ जणू काही एक ट्रॉफी पुरेशी नव्हती.

दुसऱ्या महायुद्धाचे सावट

स्पर्धा सुरू होण्याच्या काही महिने आधी हिटलरने ऑस्ट्रिया या देशाला गिळंकृत केलं. ऑस्ट्रिया आधीच स्पर्धेसाठी पात्र ठरलेला होता; पण एकदम स्पर्धेतून गायब झाला. काही ऑस्ट्रियन खेळाडूंना जर्मनीच्या संघात जबरदस्तीने घुसवलं गेलं. युरोपचा एक तगडा फुटबॉल संघ केवळ राजकारणामुळे नाहीसा झाला. ऑस्ट्रियाचा सर्वश्रेष्ठ खेळाडू मथायस सिंडेलार, ज्याला खूप कृश असल्यामुळे ‘पेपर मॅन’ म्हणत, त्याने नाझी जर्मनीसाठी खेळायला नकार दिला.

एक निरोपाचा सामना आयोजित केला गेला जर्मनी आणि अगोदरचा ऑस्ट्रियाचा संघ. त्या सामन्यात त्याने जर्मनीविरुद्ध गोल केला आणि नाझी अधिकाऱ्यांसमोर जोरात साजरा केला. बंडखोरीचे उत्तम उदाहरण; परंतु त्याची त्याने खूप मोठी किंमत मोजली.

पुढच्या एक वर्षातच त्याचा रहस्यमयरीत्या मृत्यू झाला. ऑस्ट्रियाने माघार घेतल्याने स्वीडन एकही सामना न खेळता उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचला. इटली गतविजेता म्हणून स्पर्धेत उतरली. शत्रुत्वपूर्ण वातावरण असूनही इटलीने उत्तम खेळ केला आणि अंतिम फेरीत हंगेरीला ४-२ ने हरवून स्पर्धा जिंकली.

IPL 2026: 'बाबा, हे तुमच्यासाठी' म्हणत ऐतिहासिक अर्धशतक करणारा कोण आहे CSK चा उर्विल पटेल? २८ चेंडूत शतकंही केलंय दुसऱ्या महायुद्धातील फुटबॉलपटूंची दुर्दशा

१९३९ मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर, १९३४ आणि १९३८च्या विश्वकरंडक स्पर्धेत खेळलेल्या अनेक खेळाडूंना त्यांच्या देशांच्या सैन्यात भरती करण्यात आले. विशेषतः ऑस्ट्रियन, जर्मन, हंगेरियन आणि पोलिश खेळाडूंना याचा सर्वाधिक फटका बसला. त्यामुळे अनेकांची कारकीर्द अचानक संपुष्टात आली. हे खेळाडू एकाएकी सैनिक, युद्धकैदी किंवा निर्वासित झाले. या पिढीसाठी, १९३८चा विश्वचषक हा त्यांच्या क्रीडा जीवनाचा शेवटचा टप्पा ठरला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.