तुपामध्ये खाद्यतेल आणि इसेन्सचा वापर, जालन्यात अन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई, 13 लाखांचे भेसळयुक्त तूप जप्त
रवी मुंडे, एबीपी माझा June 04, 2026 08:43 PM

Jalna Crime News :  गेल्या काही दिवसापासून राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा सपाटा सुरूच ठेवला आहे. प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या अन्न पदार्थांवर व्यापक कारवाई सुरुच आहे. अशातच आज अन्न व औषध प्रशासनान जालन्यात मोठी कारवाई केली आहे. जालन्यातील तीर्थपुरी येथे तुपाच्या कारखान्यातील भेसळीचे प्रकरण उघड केले आहे. तब्बल 13 लाखांचे भेसळयुक्त तूप जप्त करण्यात आले आहे. 

तुपामध्ये खाद्यतेल आणि इसेन्सचा वापर होत असल्याचं समोर

तुपामध्ये खाद्यतेल आणि इसेन्सचा वापर होत असल्याचं समोर आले आहे. तब्बल 1 हजार 903 लिटर भेसळयुक्त तूप जप्त करण्यात आलं आहे. जालन्यात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत भेसळयुक्त तूप  कारखान्यावर धाड  टाकून लाखो रुपयांचे भेसळयुक्त तूप जप्त केंलं आहे. जालन्यातील तीर्थपुरी येथे एका कारखान्यात असे तूप बनवले जात असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. यावेळी या कारखान्यावर धाड टाकून तब्बल 13 लाखांचे 1 हजार 903 लिटर  भेसळयुक्त तूप जप्त करण्यात आलं आहे. तीर्थपुरी येथील मुंदडा इंडस्ट्रीज या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे. यावेळी तुपामध्ये खाद्यतेल आणि इसेन्सचा वापर होत असल्याच समोर आलं आहे. दरम्यान अन्न व औषध प्रशासनाने हा कारखाना सील केला असून तुपाचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. 

राज्यात अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाईचा धडाका सुरुच

राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा धडाका सुरु ठेवला आहे. 25 मे ते 31 मे या कालावधीत राज्यभरातील विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल 1 कोटी 58 लाख 28 हजार 670 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर 102  आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच 86 आस्थापनांना टाळे लावले आहे. 

पदभार हाती घेताच तुकाराम मुंढेंकडून कारवाईचा सपाटा सुरु

अन्न व औषध प्रशासनाचे नवे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी नुकताच 25 मे रोजी आपला नवीन कार्यभार स्वीकारला. पदभार हाती घेताच त्यांनी राज्यातील जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देत सर्व विभागांतील अधिकाऱ्यांना तातडीने धाडी व जप्तीची विशेष मोहीम राबविण्याबाबत कडक निर्देश दिले होते. 

आयुक्तांच्या या आदेशानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या यंत्रणेने कमालीची तत्परता दाखवली. त्यानुसार बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या सर्वच विभागांमध्ये नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळखोरांवर, प्रतिबंधित गुटखा विक्रेत्यांवर, अस्वच्छ अन्न उत्पादकांवर आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनांविरोधात एकाच वेळी धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’ मध्ये, तीन दिवसात 53 धाडी अन् भेसळ करणारे 33 जण तुरुंगात; राज्यभरात FDA ची विशेष मोहीम

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.