नवी मुंबईत खारघरमध्ये धक्कादायक घटना
१७ वर्षीय दिव्यांग अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
पीडिता चार महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड
आरोपीला अटक करण्यात आली आहे
Navi Mumbai Kharghar Rape Case नवी मुंबईतील खारघर परिसरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका १७ वर्षीय दिव्यांग अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या अत्याचारामुळे पीडित मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले असून, या प्रकरणाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अल्पवयीन असून ती दिव्यांग आहे. ती दिव्यांग असल्याचा फायदा घेत आरोपीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिच्याशी संपर्क साधला. सुरुवातीला ओळख वाढवत त्याने तिच्याशी मैत्री केली. काही दिवस संवाद साधल्यानंतर आरोपीने मुलीचा विश्वास संपादन केला आणि चार महिन्यांपूर्वी तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
Nandurbar : महाराष्ट्रातील दुर्गम पाड्यावर पहिल्यांदाच चमत्कार घडला! गावकऱ्यांसह लहान मुलं आनंदानं उड्या मारायला लागलेदरम्यान, काही दिवसांपूर्वी पीडित मुलीची प्रकृती अचानक बिघडल्याने तिच्या पालकांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. ही बाब समजताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. मुलगी दिव्यांग असल्यामुळे सुरुवातीला तिच्यावर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीबाबत स्पष्ट माहिती मिळू शकली नाही.
Gold Rate Update : ग्राहकांसाठी सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या ताजे भावयानंतर मुलीच्या पालकांनी खारघर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. चौकशीदरम्यान आणि मुलीकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवत बुधवारी (३ जून) आरोपीला अटक केली.
Monsoon Update : पुढील काही तासांत केरळमध्ये मान्सून धडकणार, राज्यात मुसळधार पाऊस; 'या' जिल्ह्यांना अलर्ट, वाचा IMD चा अंदाजया प्रकरणात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांखाली तसेच अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचारासंदर्भातील 'पोस्को' (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची चौकशी सुरू असून त्याने यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचाही तपास केला जात आहे.