एकमेकांच्या मिठीत घेतला शेवटचा श्वास, दिल्लीच्या आगीत प्रेमाचा करुण अंत; सुन्न करणारी कहाणी
Tv9 Marathi June 05, 2026 12:45 AM

Delhi Hotel Fire : राजधानी दिल्लीतील फ्लॉरिश हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत एकूण 21 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत काही लोकांनी आगाने होरपळल्यामुळे जीव गमावला तर काही लोकांच्या नाकातोंडात धूर गेल्याने गुदरमून त्यांचा अंत झाला. या घटनेच्या हादरवून टाकणाऱ्या अनेक कहाण्या समोर येत आहेत. बचावकार्य करणाऱ्या लोकांनीदेखील या आगीच्या घटनेची भीषणता किती होती, याबाबत सांगितलं आहे. आग लागल्यानंतर हॉटेलमध्ये जळालेले सामान, लोकांचा जळालेले मृतदेह पाहून मन सुन्न होत आहे. दरम्यान, या आगीत एका कपलचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेहाचे काही फोटो समोर आले असून आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्यांनी एकमेकांना साथ दिली आहे. त्या दोघांनीही साक्षात मृत्यू समोर उभा असताना एकमेकांना शेवटपर्यंत साथ दिली आहे.

महिलेचे डोके पुरुषाच्या खांद्यावर

फ्लॉरिश हॉटेलमध्ये आग लागल्यानंतर युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात आले. परंतु तरीदेखील 21 जणांचा मृत्यू झाला. हेच बचावकार्य करणाऱ्या मनाला चटका लावणारे दृश्य सांगितले आहे. बचावकार्य करणाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे हॉटेलमधील बंद वॉशरुममध्ये एक कपल मृतावस्थेत आढळले. त्या बाथरुममध्ये महिला टॉयलेट सीटवर बसलेली होती. तर तिच्याजवळ एक माणूस खुर्चीवर बसलेला होता. महिलेने आपले डोके पुरुषाच्या खांद्यावर ठेवलेले होते. दोघांनाही एकमेकांना मिठीत घेतलेले होते. या दोघांचाही तशाच अवस्थेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

कपलचा मृत्यू आगीने नव्हे तर धुराने

हे दृश्य पाहून बचावकार्य करणाऱ्या लोकांचेही मन हेलावून गेले आहे. आगीपासून स्वत:ला वाचवण्यासाठी हे कपल बाथरुममध्ये गेले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आपला जीव वाचेल अशी दोघांनाही आशा होती. बचावकार्य करणाऱ्या एकाने सांगितल्यानुसार या कपलचा मृत्यू आगीने नव्हे तर धुराने झालेला आहे. आम्ही त्यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती बचावकार्य करणआऱ्या मोहम्मद शोएब यांनी दिली आहे.

दरम्यान, त्याच हॉटेलमध्ये आणखी एका खोलीत जळालेल्या अवस्थेत एक कपल आढळले. दोघांचाही मृतदेह पूर्णपणे जळाला होता. मृत्यूची ही कहाणी ऐकून देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.