पाहुण्या न्यूझीलंड क्रिकेट टीमने यजमान इंग्लंडला पहिल्या कसोटी (England vs New Zealand 1st Test) सामन्यातील पहिल्या दिवशी पहिल्या डावात 150 धावांच्या आत गुंडाळलं आहे. न्यूझीलंडने लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये इंग्लंडचं 39.4 ओव्हरमध्ये 140 रन्सवर पॅकअप केलं. इंग्लंडला गुंडाळण्यात कायल जेमीसन याने प्रमुख भूमिका बजावली. इंग्लंडच्या 6 फलंदाजांना दुहेरी आकड्यापर्यंतही पोहचता आलं नाही. हॅरी ब्रूक याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. तर प्रमुख फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे इंग्लंडची घरच्या मैदानात अशी वाईट स्थिती झाली. त्यामुळे न्यूझीलंडकडून कडक बॅटिंग करुन मोठी आघाडी घेण्याची संधी आहे. त्यामुळे न्यूझीलंड आता इंग्रजांसमोर कशी बॅटिंग करते हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.