सैफ अली खानचा मुलगा रुमर्ड गर्लफ्रेंडसोबत पिक्चर बघायला गेला; पॅपाराझी दिसताच 'तिला' लपवलं VIDEO
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क June 05, 2026 12:43 PM

Ibrahim Ali Khan and Palak Tiwari Movie Date: सैफ अली खानचे (Saif Ali Khan) पुत्र इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) सध्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहे.  इब्राहिमच्या आयुष्यात एका अभिनेत्रीची (Entertainment) एन्ट्री झाली असल्याचं बोललं जात आहे.  त्याचं नाव वारंवार पलक तिवारीसोबत (Palak Tiwari) जोडलं जात आहे. असं म्हटलं जातंय, दोघेही सध्या एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही एकत्र वेळ घालवत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. पापाराझींनी दोघांनाही सीक्रेट डेटवर जाताना अनेकदा पाहिलं आहे.  आता डेटिंगच्या अफवांमध्ये इब्राहिम पुन्हा एकदा रुमर्ड गर्लफ्रेंडसोबत स्पॉट झाला आहे.  पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान मुव्ही डेटवर  गेले असल्याची माहिती एका व्हायरल व्हिडीओतून समोर आली आहे.

इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी एकमेकांना डेट करत आहेत? (Ibrahim Ali Khan hides Palak Tiwari from Paparazzi)

पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान या दोघांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.  सिनेमा संपल्यानंतर दोघेही जुहूतील पीव्हीआरमधून बाहेर पडताच, तिथे आधीच उपस्थित असलेल्या पापाराझींनी त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्यास सुरुवात केली.  याची त्यांना कल्पनाही नव्हती. व्हायरल व्हिडीओत इब्राहिम फोनवर बोलत कॉरिडोरमधून बाहेर निघताना दिसत आहे.  पापाराझी  दिसताच, कॅमेऱ्यात कैद होण्यापासून वाचण्यासाठी त्यानं पलकला आत ढकलले. 

व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे की, इब्राहिम पलकला कॅमेऱ्यांपासून लपवण्याचा प्रयत्न करतोय. परंतु, असे करुनही दोघेही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.  मागच्या साईडलाही काही पापाराझी उपस्थित होते. त्यांनी या कपलला कॅमेऱ्यात कैद केले.  या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने कमेंटमध्ये, 'जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात तर, लपवण्याचं कारण काय?' असं म्हटलं आहे. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

तर, आणखी एका नेटकऱ्याने, 'दोघांची खूप सुंदर जोडी आहे', असं कमेंटमध्ये म्हटलं आहे.  तर, दुसऱ्या युझरने, 'हे दोघेही नेमकं लपत का आहेत?', असं कमेंटमध्ये म्हटलं आहे.  काही लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये पलक आणि इब्राहिमच्या प्रायव्हसीला पाठिंबा दिला आहे. तसेच पापाराझींच्या हस्तक्षेपावर संताप व्यक्त केला आहे.  

महत्त्वाच्या इतर बातम्या:

राम चरणचा दमदार अभिनय, पण तीन तासांत सर्व दाखवण्याच्या प्रयत्न फसला; तरी का पाहावा 'पेद्दी'?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.