सध्या राज्यात विधान परिषदेची रणधुमाळी सुरू असतानाच अनेक राजकीय घडामोडींनाही वेग आला. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालचा दिवस होता. अनेक बंडखोरांनी कालचा दिवस गाडवला. त्यांना शात करताना महायुतीचे नेते दिसत होते. तर महाविकास आघआडीमध्ये उलट चित्र होतं. काही जणांनी काल अचानक निवडणुकीतून माघार घेतली. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधानपरिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार (शिवसेना ठाकरे गट) सुरेंद्र ऊर्फ बाळ माने यांनी काल उमेदवारी मागे घेतली आणि त्यानंतर त्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.न त्यानंतर माने यांनी सोशल मीडियावर स्टेटस ठेवलं होतं.
कालच्या घडामोडींनंतर बाळ माने हे आज थेट मुंबईत दाखल झाले असून टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी कालच्या माघारीच्या निर्णयावर सविस्तर प्रतिक्रिया दिली. तसेच यावेळी त्यांनी विनायत राऊत यांच्यावर काही गंभीर आरोपही केले. तसेच पुढल्या वाटचालीबद्दलही त्यांनी भाष्य केलं.
काय म्हणाले बाळ माने ?
राजकारणात यशस्वी माघार घेणं, दोन पावलं जाणं योग्य असतं. मी निवडणुकीला उभं राहून मला जर फक्त 55 मतं मिळाली असती, माझ्या पक्षाची,आणि महाविकास आघआडीची मत पडली नसती तर ती जी बेइज्जती झाली असती, त्यापेक्षा काल यशस्वी माघार घेऊन आम्ही कोकणात एक चांगला पायंडा आम्ही पाडला. घोडेबाजार आम्ही केला, हेच वारंवार सांगतोय. पण मला न विचारात, काहीही चर्चा न करता निर्णय घेण्यात आला. एखादा माणूस चुकीचा वागला असं वाटत असेल तर कारण विचारल पाहिजे, कारणे दाखवा नोटीस दिली पाहिजे. मी उपनेता आहे, 40 वर्ष सामाजिक , राजकीय क्षेत्रात काम करतोय, 5 वर्ष मी आमदार म्हणून काम केलं आहे, असं माने म्हणाले.
लोकं काय बोलतात, आत्मपरीक्षण करा, मानेंचा विनायक राऊतांवर निशाणा
संजय राऊत साहेबांनी माझी हकालपट्टी केल्याचा निर्णय जाहीर केला. टीव्हीवर मी ते पाहिलं , पण एकदा संजय राऊतांनी माझी हकालपट्टी केल्यावर विनायक राऊत डोमकावळ्यासारखे चिवचिव करत तिथे आले आणि म्हणाले , हे घेतलं, ते घेतलं, आर्थिक व्यवहार झाले. ओ विनायक राऊत साहेब तुम्ही कोणावर बोलता? आपल्या पक्षातील लोक तुमच्याबद्दल काय बोलतात, याचं आत्मपरीक्षण करा, असा सला माने यांनी राऊत यांना दिला.
लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंशी बेईमानी केली
तुम्ही 2024 साली तुमची रत्नागिरीची, सिंधुदुर्गची लोकसभा निवडणूक जिंकण्याकरता पालघरच्या फर्न हॉटेलमध्ये काय करत होता ? त्या ठिकाणी तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी बेईमानी केली आणि तिथला लोकसभेचा खासदार पडला. पालघर जिल्ह्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून, आनंद दिघे यांच्या काळापासूनच काम आहे, मतदार आहेत , त्या तिथल्या निवडणूकीत तुम्ही हाराकिरी केली, असे आरोप माने यांनी केले.