Virat Kohli : भारतात जगतोय तसं आयुष्य विराट कोहलीला नकोय… सोबत खेळलेल्या खेळाडूचं मोठं वक्तव्य
admin June 05, 2026 04:24 PM

भारतातीलल सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक असलेला, स्टार खेळाडू विराट कोहलीचे कोट्यवधी चाहते आहेत. तो कुठेही गेला, त्यानेही काहीही केलं की लगेच मीडियात, सोशल मीडियावर चर्चा सुरू होता. त्याच्यावर सदैव स्पॉटलाइट असतो.
क्रिकेटमध्येही कॅमेरे कोहलीच्या हालचालींवर सतत नजर ठेवून असतात. विकेट घेतल्यानंतरचा त्याचा जल्लोष असो, त्याची मौजमजा असो किंवा इतर काहीही असो, कॅमेरे नेहमी त्याच्यावर असतात. याचं कारण स्पष्ट आहे: चाहत्यांना त्याला पाहायचं असतं आणि त्याच्याबद्दलची चाहत्यांची क्रेझ एका वेगळ्याच पातळीवर पोहोचली आहे. पण विराटलं तसं आयुष्य नकोय, हा दावा केला आहे लियाम लिविंग्स्टन या खेळाडूने. RCBमध्ये त्याच्यासोबत खेळलेल्या, ड्रेसिंग रूम शेअर केलेल्या या खेळाडूच्या विधानाने नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

मायकल वॉनच्या पॉडकास्टमध्ये आलेल्या लियाम लिव्हिंगस्टनला विपाटबद्दल विचारण्यात आलं. “विराट कोहली ड्रेसिंग रूममध्ये कसा असतो?” त्याववर लिव्हिंगस्टन म्हणाला, “तो अप्रतिम आहे. मी नेहमीच विराटविरुद्ध खेळलो आहे आणि तो नेहमी हसत असतो. जर कोणी उपहासात्मक टिप्पणी किंवा काही कमेंट केली, तर तो नक्कीच प्रत्युत्तर देतो. मैदानावर खूप स्पर्धात्मक असतो.” असं लिव्हिंगस्टनने नमूद केलं.

मैदानाबाहेर एकदम वेगळा

मात्र ज्याक्षणी कोहली मैदानाबाहेर जातो, तो एकदम वेगळा माणूस बनतो. क्रिकेटपासून दूर, तो एक अतिशय शांत आणि प्रेमळ व्यक्ती आहे, त्याला आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडतो. तो खूप संयमी आहे, असं लिव्हिंगस्टनने सांगितलं.

” ज्या पद्धतीचं आयुष्य (सतत फोकसमध्ये , लाइमलाइटमध्ये असणं) तो भारतात जगतो, कदाचित त्याला तसं आयुष्य जगायचं नाहीये. सगळ्यांची नजर सतत आपल्यावर असावी असं त्याला वाटत नाही, तो खूप चांगला माणसू आहे. पण मैदानावर उतरताच तो सर्वात मोठा प्रतिस्पर्धी बनतो ” असं इंग्लंडच्या खेळाडूने नमूद केलं.

विराट-अनुष्काचं आयुष्य

2017 साली विराट आणि अनुष्काने लग्न केलं. त्यांना वामिका ही मोठी मुलगी आणि अकाय हा मुलगा आहे. विराट कोहली आपल्या कुटुंबासह इंग्लंडला स्थलांतरित झाल्याचं बोललं जातं. तो भारतात मुक्तपणे राहू शकत नाही आणि इंग्लंडमध्ये जसा मोकळेपणाने फिरू शकतो, तसा येथे फिरू शकत नाही, असं त्यामागचं कारण बोललं जातं.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.