How To Save Money: अनेकदा पगार झाला की तो अवघ्या दोन-चार दिवसात संपतो. पगार मग एक तारखेला होऊ की सात तारखेला, अथवा महिन्याच्या अखेरीस पगार झाला काय? अनेकदा या पैशाला पाय फुटतात. एआयच्या (AI) युगात प्रत्येकाकडे जवळपास स्मार्टफोन हाती आला आहे. त्यात युझर्स ChatGPT चा पर्याय समोर आला आहे. चॅटजीपीटीला अनेक जण विविध विषयांवर मार्गदर्शन मागतात. फॅशन, स्टायलिंगपासून ते कुकिंग आणि अभ्यासाच्या टिप्स यासाठी चॅटजीपीटीचा वापर करतात. आर्थिक सल्ल्यासाठी सुद्धा चॅटजीपीटीचा वापर होतो. चॅटजीपीटीला पगारातील रक्कम वाचवण्याविषयी आणि बचतीविषयी सल्ला विचारण्यात आला. काय दिला चॅटजीपीटीने सल्ला?
ChatGPT च्या स्मार्ट सेव्हिंग टिप्स
पगार येताच अगोदर बचतीचे नियोजन करा.
आजपासूनच खर्च कुठे आणि किती झाला हे नमूद करा.
UPI आणि Credit Card खर्च मर्यादा आखा, ती निश्चित करा.
सवलतीच्या मोहात अतिरिक्त शॉपिंग टाळा, वायफळ खर्च होऊ देऊ नका.
योजना आखा आणि छोटी बचत करा आणि ती रक्कम गुंतवा.
गरजेवेळी अत्यावश्यक निधीची तरतूद करून ठेवा.
एखादे ठिकाणी नाहक Subscription सुरू असेल तर ते तपासा.
मासिक आर्थिक ताळेबंद अगोदरच आखा, त्यानुसार खर्च करा.
नाहक शॉपिंग टाळण्याचा प्रयत्न करा, ऑनलाईन वस्तू दिसली की ती गरज नसताना खरेदी करू नका.
50-30-20 नियम फायदेमंद आहे, त्याचा प्रयोग करून पाहा.
बचत तर कराच पण गुंतवणूकही करा
सर्वात अगोदर तुमच्या अत्यावश्यक गरजा ओळखा. त्यानंतर पगार जमा झाल्यावर त्यातील 10 ते 20 टक्के रक्कम बाजूला काढा.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे दैनंदिन खर्च कुठे आणि किती होतो. त्यात अनावश्यक खर्च किती केला याचा रोज मागोवा घ्या.
50-30-20 चा नियम पाळा. त्यात 50% अत्यावश्यक खर्च, 30% लाईफस्टाईलवरील खर्च तर 20% बचत असे नियोजन करा.
महिन्याला 500 वा 1000 रुपयांची म्युच्युअल फंडमध्ये SIP वा RD सुरू करा. कारण ही कासवासारखी बचत तुम्हाला दीर्घकाळानंतर मोठा परतावा देईल.