Veen Doghantli Hi Tutena: मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकार सुबोध भावे (Subodh Bhave) यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत सिनेमा तसेच मालिकेतून (Serial) आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं. सध्या अभिनेता सुबोध भावे 'वीण दोघांतली ही तुटेना' (Veen Doghantli Hi Tutena) या मालिकेमुळे चर्चेत आहे. या मालिकेत सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) यांच्या मुख्य भूमिका आहेत. दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती पाहायला मिळत आहे. सुबोध भावे सध्या आपल्या फॅमिलीसोबत स्वित्झर्लंड ट्रीपला गेला आहे. तिथे देखील अभिनेता या मालिकेसाठी विशेष काम करत आहे. सुबोध भावे यांनी याचा व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला आहे.
सुबोध भावे सध्या स्वित्झर्लंडमध्ये आहे. अभिनेत्यासोबत त्यांची 2 मुलं देखील आहे. सुबोध भावे यांनी अलिकडेच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सुबोध भावे हे स्वित्झर्लंडच्या सुंदर रस्त्यावर उभे राहून शुट करत आहे. सुबोध हे समरच्या लूकवर दिसत असून, ते फोनवर बोलताना दिसत आहे.
विशेष म्हणजे, सुबोध भावेंचा हा सीन मुलगा कान्हा शूट करत असल्याचं दिसत आहे. तर, मल्हार हा समोरच्या व्यक्तीचे संवाद म्हणून दाखवत आहे. सुबोध भावे यांनी सोशल मिडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे. 'परदेशात असूनही वीण काही तुटत नाही. कुटुंबासोबत फिरायला आलोय. परंतु, काम थांबता कामा नये. मी समरची मिशी घेऊन फिरतोय. सीन आला की जागा बघून सीन शूट करतोय, आणि पाठवतोय. तर मल्हार हा समोरच्या व्यक्तीचे संवाद म्हणून दाखवतोय'.
View this post on Instagram
'आता स्वत: निर्मात्याच्या भूमिकेत असल्यामुळे आमचे मालक हे सगळं समजून घेत आहेत. मंजिरी थँक यू अन् लव्ह यू', असं त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. सुबोध यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. अनेकांनी त्यांची कामाप्रति असलेली निष्ठा पाहून त्यांचं कौतुक केलं आहे. 'परदेशात कुटुंबासोबत असताना, तुमचं कामाप्रति असलेलं प्रेम दिसून आलं', असं एकाने कमेंटमध्ये म्हटलं आहे. तर, 'सलाम.. शो मस्ट हो ऑन', असं दुसऱ्या युझरने कमेंटमध्ये म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या: