Maa Behen Review: 'मां बहन' (Maa Behen) सिनेमाचं (Movie Review) नाव ऐकून कदाचित तुम्हालाही धक्का बसला असेल. सिनेमातील कास्टिंगही (Entertainment) पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं असेल. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या सिनेमात एक आई आणि त्यांच्या दोन मुलींची गोष्ट दाखवण्यात आली आहे. या सिनेमात धक धक गर्ल माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी आणि कंटेट क्रिएटर धारणा यांची मुख्य भूमिका आहे. या सिनेमासाठी झालेली कलाकारांची निवड पाहून, तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं ना? सिनेमाचा ट्रेलर पाहून, हा चित्रपट पाहण्याची अनेकांची ओढ वाढली होती. हा सिनेमा प्रेक्षकांच्या अपेक्षांनाही पूर्ण करतो. हा सिनेमा नेमका आहे तरी कसा? जाणून घेऊयात.
या सिनेमातील गोष्ट आई रेखा (माधुरी दीक्षित) आणि त्यांची मुलगी जया आणि सुषमा (जया आणि सु्षमा) म्हणजेच (रेखा, जया आणि सुषमा) यांच्यावर आधारीत आहे. या माय लेकी मिळून कोणत्या न कोणत्या घोटाळ्यात अडकतात. परिसरात त्यांची चांगली प्रतिष्ठा असते. पण एक मोठा कांड घडतो. त्यांच्या घरी गुप्ताजी म्हणजेच रवि किशनची हत्या होते. नंतर नेमकं काय होतं, हे आपल्याला नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
नेटफ्लिक्सवर हा सिनेमा रिलीज झाला आहे. ओटीटीवर प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येईल. हा सिनेमा एक निव्वळ मनोरंजन आहे. या सिनेमातून कोणता मेसेज मिळेल, याची अपेक्षा ठेवू नका. मेकर्सने या सिनेमातून केवळ मनोरंजन दिले आहे. पहिल्यापासून हा सिनेमा मुद्द्यावर येतो. यात अनेक कॉमिक सीन्स आहेत. माधुरीचा अंदाज आपल्याला नक्कीच आवडेल.
प्रत्येक पात्र आपल्याला खिळवून ठेवतो. प्रत्येक पात्र खरोखरंच अप्रतिम आहे. तुम्ही कधी कधी हसता तर, कधी कधी या सिनेमाचा आनंद घेता. सुरुवात ते शेवट हा सिनेमा तुम्हाला खिळवून ठेवतो. हा सिनेमा अधुनमधून थोडा मंदावतो. परंतु, सिनेमातील पात्र तुम्हाला गुंतवून ठेवतात. या सिनेमातील मिस्ट्रीपेक्षा कलाकारांच्या भूमिका तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतात. हा सिनेमा तुम्ही शेवटपर्यंत त्याचा आनंद घेत, रहस्य उलगडण्याची वाट बघतात. या चित्रपटाचा ट्रेलर इतका चांगला होता की अपेक्षा गगनाला भिडल्या होत्या. हा सिनेमा खूप चांगला आहे.
या सिनेमात माधुरी दीक्षितने कमालीची अॅक्टिंग केली आहे. या चित्रपटात तिचा वेगळाच अंदाज पाहायला मिळतो. तिचं सौंदर्य तुमचं हृदय जिंकेल. तृप्ती डिमरीने या सिनेमात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तृप्तीने पुन्हा एकदा सिद्ध केले की, ती अभिनयाला वाव देणाऱ्या भूमिका हाताळू शकते. धारणानं कंटेट क्रिएटर्स अभिनय करु शकत नाहीत, हा समज मोडीत काढलाय. तिनं या सिनेमात उत्तम काम केलं आहे. रवि किशन या सिनेमाची खरी ताकद आहे. गीतांजली कुलकर्णीनेही चांगले काम केले आहे.
पूजा तोलानी यांचे लेखन उत्तम आहे. सुरेश त्रिवेणी यांचे दिग्दर्शन उत्कृष्ट आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत हिट सिनेमांचं दिग्दर्शन केले आहे. हा सिनेमा मनोरंजक असून, शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.
रेटिंग - 3 स्टार्स.
महत्त्वाच्या इतर बातम्या: