IND vs AFG: अफगाणिस्तानविरुद्ध कशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन? कधी आणि कुठे होणार सामना, जाणून घ्या
esakal June 05, 2026 09:45 PM

India vs Afghanistan Test: भारतीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नव्या हंगामाला सुरुवात करण्यास सज्ज झाली आहे. भारताला शनिवारपासून (६ जून) अफगाणिस्तानविरुद्ध मुल्लनपूरमध्ये एकमेव कसोटी सामना खेळयचा आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ न्यू चंदिगढमध्ये असून सरावही करत आहेत.

गेल्यावर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या निराशाजनक कसोटी मालिका पराभव मागे टाकून शुभमन गिलच्या नेतृत्वातील भारतीय संघ आता नवी सुरुवात करण्यास उत्सुक असेल.

रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह या प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिलेली असताना मानव सुतार, हर्ष दुबे, गुरनूर ब्रार हे नवे चेहरे भारतीय कसोटी संघाचा भाग आहेत. पण यातील किती जणांना संधी मिळणार हे नाणेफेकीवेळी समजेल

IND vs AFG: रिषभ पंतला कसोटी उपकर्णधारपद काढून घेतल्यानंतर गौतम गंभीरची वॉर्निंग; म्हणाला, 'त्याने बदलण्याची गरज नाही, पण...'

या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने हे स्पष्ट केले आहे की तिसऱ्या क्रमांकावर साई सुदर्शन खेळणार आहे. त्याला पुरेशा संधी देणे गरजेचे असल्याचे मत गंभीरने व्यक्त केले होते. त्यामुळे देवदत्त पडिक्कलला संधी आणखी प्रतिक्षा करावी लागले, हे देखील स्पष्ट झाले आहे.

तथापि, केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांची जोडी सलामीला खेळताना दिसू शकते, तर कर्णधार शुभमन गिल विराट कोहलीच्या चौथ्या क्रमांकावर खेळणे कायम करण्याची शक्यता आहे.

कसोटीत यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतच अजूनही भारतीय संघाची पहिली पसंती आहे, त्यामुळे तो यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळण्यासोबत मधल्या फळीत फलंदाजी करताना दिसेल. वॉशिंग्टन सुंदरलाही दुहेरी जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. तो फलंदाजीसोबतच फिरकी गोलंदाजीचीही जबाबदारी सांभाताना दिसू शकतो.

याशिवाय अष्टपैलू खेळाडू म्हणून नितीश कुमार रेड्डीलाही संधी मिळू शकते. फिरकी गोलंदाजीत कुलदीप यादव धूरा सांभाळताना दिसेल, त्याच्यासोबत हर्ष दुबे किंवा मान सुतार यांच्यापैकी एकजण फिरकी गोलंदाजी करण्यासाठी असेल.

वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा सांभाळतील. ध्रुव जुरेल आणि गुरनूर ब्रार यांना मात्र प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

भारताचा संभावित प्लेइंग इलेव्हन -

केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, हर्ष दुबे/ मानव सुतार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

IND vs AFG, ODI: विराट कोहलीच्या बदली खेळाडूसाठी केवळ ऋतुराज गायकवाडच नाही, तर 'हे' तीन खेळाडूही शर्यतीत वेळ अन् Live Streaming

भारत आणि अफगाणिस्तान संघात मुल्लनपूरला होणारा सामना शनिवारी सकाळी ९.३० वाजता सुरू होईल. त्याआधी ९ वाजता नाणेफेक होईल. सामन्यातील प्रत्येक दिवसाचा खेळ सकाळी ९.३० वाजता चालू होणार आहे. हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सच्या चॅनेलवर लाईव्ह पाहाता येईल. तसेच जिओहॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.