महिलांना मोठा धक्का! फुले वाड्यात वटपौर्णिमेची पूजा बंद; राज्य सरकारचा निर्णय, कारण काय?
Saam TV June 05, 2026 10:45 PM

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे: ऐतिहासिक वारसा जपण्याच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेत, पुण्यातील फुले वाड्यात यंदा वटसावित्री पूजेसह कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. याबाबत पुरातत्व विभागाने अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांचे वंशज प्रशांत फुले यांनी यासंदर्भात सरकारकडे याचिका दाखल केली होती. ऐतिहासिक वास्तूचे पावित्र्य राखणे आणि सांविधानिक नियमांचे पालन होणे आवश्यक असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला होता. त्यानंतर सरकार आणि संबंधित विभागाने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

Pune Crime News : दिवसाढवळ्या गोळीबार, पुण्यातील पाटस हादरलं; दोन गटांतील वादानंतर तुफान हाणामारी

गेल्या वर्षी वटपोर्णिमेच्या दिवशी फुले वाड्यात पूजा करण्यावरून महिला, पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर यंदा कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने धार्मिककार्यक्रमांवर बंदी लागू केली आहे.

हृदयद्रावक! सर्पदंशाने ३ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; कुटुंबीयांनी सापच आणला रुग्णालयात

पुरातत्व विभागाने स्पष्ट केले आहे की, संरक्षित ऐतिहासिक वास्तूंमध्ये कोणतेही धार्मिक किंवा सार्वजनिक कार्यक्रम घेताना नियमांचे काटेकोर पालन आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन होऊ नये आणि वारसा स्थळांचे संरक्षण व्हावे, या उद्देशानेच हा निर्णयघेण्यात आला आहे. दरम्यान या निर्णयामुळे पुन्हा एकदा फुले वाडा वाद चर्चेत आला असून, सामाजिक आणि राजकीय पातळीवर विविध प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.