Pimpari-Chinchwad: पिंपरी-चिंचवडकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, १४ दिवसांसाठी जमावबंदी; काय सुरू अन् काय बंद?
Saam TV June 05, 2026 09:45 PM
  • पिंपरी-चिंचवडमध्ये १० जून ते २३ जून २०२६ दरम्यान जमावबंदीचे आदेश लागू

  • ५ पेक्षा जास्त लोकांचा जमाव, सभा आणि मिरवणुकींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

  • शस्त्रे, स्फोटके, दाहक पदार्थ आणि प्रक्षोभक घोषणांवर बंदी घालण्यात आली आहे.

  • आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत कारवाई होणार आहे.

पिंपरी-चिंचवडकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमध्ये १४ दिवसांची जमाव बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी करण्यात आले आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. पोलिसांनी सांगितलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पिंपरी - चिंचवडपोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करुन आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करुन पिंपरी - चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात १० जून २० रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते २३ जून २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

Pimpari Chinchwad: नकुल भोईर हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, बायकोच्या प्रियकराला अटक; पूर्वनियोजित कट रचत... १४ दिवसांच्या कालावधीमध्ये खालील कृत्याला असणार बंदी -

- कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणे.

- दगड अथवा शस्त्रे किवा अस्खे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे आणि साधने बरोबर नेणे.

- शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका आणि शारिरीक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे.

- कोणत्याही इसमाचे चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन आणि दहन करणे.

- मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे.

- राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे.

- कोणतेही जिन्नस तयार करुन त्याचा जनतेत प्रसार करणे.

- ज्या परिसरात कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पध्दतीने कलम ३७(१) आणि (३) विरुध्द वर्तन करणे.

- कलम ३७ चे पोटकलम (३) अन्वये ५ पेक्षा जास्त लोकांचा जमाव करणे.

- पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांचे पूर्व परवानगी शिवाय सभा घेणे किंवा मिरवणुका काढणे

Pimpari-Chinchwad: पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, जागा वाटपावरही झाला निर्णय; अजित पवार काय म्हणाले?

दरम्यान, पोलिसांनी१४ दिवसांसाठी जारी केलेल्या जमाव बंदीच्या आदेशाचे पालन करण्यास सांगण्यास आले आहे. वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना आणि ज्यांना आपल्या वरीष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार वाळगणे आवश्यक आहे आणि त्याबबात परवानगी आहे त्यांना लागू होणार नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलिस अधिनियम सन १९५१ 1 चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र असणार आहे.

Pimpari- Chinchwad: पुण्यात AI चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या, सीट बेल्टच्या सहाय्याने घेतला गळफास
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.