घोडेगाव - घोडेगाव पोलीस ठाणे हद्दीत 03 जून रोजी (करवंदेदरा, वालकोळीवाडी, गोहे बुद्रुक, ता. आंबेगाव) या गावच्या हद्दीत गावकीचे विहीरीत आश्विनी तानाजी वालकोळी (वय-28 वर्षे) अक्षिदा तानाजी वालकोळी (वय-05 वर्षे) कार्तिक तानाजी वालकोळी (वय-03 वर्षे) सर्व रा. वालकोळीवाडी, गोहे बुद्रूक यांचा पाण्यात बुडुन मृत्यू झाला. या प्रकरणी आत्महत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचे पती तानाजी शंकर वालकोळी, सासु सिताबाई शंकर वालकोळी, दिर शिवाजी शंकर वालकोळी, जाऊ सुनिता शिवाजी वालकोळी (सर्व रा.वालकोळीवाडी, गोहे बुद्रुक) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणीचा गुन्हा घोडेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. याप्रकरणी पती व दिरास घोडेगाव पोलिसांनी अटक केली आहे.
कौंटुबिक कारणावरून मयत मुलगी आश्विनी हिस सतत मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून तिचे मुलांना देखील त्रास दिल्यामुळे तिचे सासरच्या लोकांच्या जाचाला व त्रासाला कंटाळुन मयत अश्विनीने आत्महत्या केली आहे.
कौंटुबिक कारणावरून मयत मुलगी आश्विनी हिस सतत मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून तिचे मुलांना देखील त्रास दिल्यामुळे तिच्या सासरच्या लोकांच्या जाचाला व त्रासाला कंटाळुन तिचे जीवन जगणे असहाय झाल्याने मुलगी अक्षिदा व मुलगा कार्तिक यांचेसह गावकीचे विहीरीत उडी मारून पाण्यात बुडुन आत्महत्या केली. 04 जून रोजीचे दिलेल्या फिर्यादी जबाबाप्रमाणे घोडेगाव पोलीस ठाण्यात आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्हयातील मयत अश्विनी हिचे पती तानाजी शंकर वालकोळी व दिर शिवाजी शंकर वालकोळी यांस घोडेगाव पोलीसांनी तात्काळ अटक केली असुन, तिची सासु व जाऊ यांचे अटकेबाबत योग्य ती कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.