किनवट (नांदेड) : उन्हाळ्याचा शेवट आणि पावसाळ्याच्या आगमनाची चाहूल लागताच बाजारात जांभळांची आवक वाढू लागली आहे. किनवट शहरात मागील काही दिवसांपासून रस्त्यांवर, चौकांमध्ये तसेच भाजी बाजार परिसरात जांभूळ विक्रेते दिसून येत आहेत. सध्या जांभूळ ३०० रुपये किलो दराने विकले जात असून, ग्राहकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
काळसर-जांभळ्या रंगाचे आणि आंबट-गोड चवीचे हे हंगामी फळ केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यासाठीही (jamun benefits for diabetes control) अत्यंत लाभदायक मानले जाते. विशेषतः मधुमेह नियंत्रण, पचनसंस्थेचे आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी जांभूळ उपयुक्त असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
जांभळाचे आरोग्यदायी फायदेमधुमेह नियंत्रणासाठी उपयुक्त : जांभळामध्ये आढळणारे जॅम्बोलिन आणि जॅम्बोसीन हे घटक रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी जांभूळ फायदेशीर ठरते.
पचनशक्ती सुधारते : जांभळातील तंतूमय पदार्थ (फायबर) पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात. अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांमध्येही ते उपयुक्त ठरते.
Tadgola Fruit Benefits : कर्करोग आणि हृदयविकारापासूनही करणार रक्षण! उन्हाळ्यातील 'हे' खास फळ आहे गुणधर्मांची खाण; आजच आहारात करा समावेशरोगप्रतिकारक शक्ती वाढवते : व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि विविध खनिजांनी समृद्ध असलेले जांभूळ शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते.
रक्त शुद्धीकरणास सहायक : जांभळातील नैसर्गिक गुणधर्म रक्त शुद्ध ठेवण्यास मदत करतात. तसेच त्वचेच्या आरोग्यासाठीही ते लाभदायक मानले जाते.
Health Benefits of Bhakri : दररोज भाकरी खाल्ल्याने काय होते?हृदयासाठी फायदेशीर : पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्समुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होण्यास हातभार लागतो.
वजन नियंत्रणासाठी उपयुक्त : कमी कॅलरी आणि जास्त फायबर असल्याने जांभूळ खाल्ल्यानंतर पोट भरल्याची भावना निर्माण होते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.
Monsoon Forecast : हवामान खातं नाही, तर 'हा' छोटासा पक्षी सांगतोय यंदा पाऊस कसा होणार; ग्रामीण भागातील पिढ्यान् पिढ्यांचा विश्वास! कमी प्रमाणात सेवन करण्याचा सल्लाआरोग्यदायी गुणधर्मांनी समृद्ध असले तरी जांभूळ कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. विशेषतः रिकाम्या पोटी किंवा अतिप्रमाणात जांभूळ खाल्ल्यास काहींना पचनासंबंधी तक्रारी उद्भवू शकतात. शहरात सध्या जांभळांची आवक वाढल्याने नागरिकांना चव आणि आरोग्याचा दुहेरी लाभ मिळत आहे. त्यामुळे हंगामी फळांचा आस्वाद घेताना जांभूळ हे अनेकांच्या पसंतीचे फळ ठरत आहे.