Jalgaon Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! जळगावमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक, चौघांचा जागीच मृत्यू
Saam TV June 06, 2026 01:45 AM
  • जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ भीषण अपघात

  • कारची दुचाकीला जोरदार धडक

  • अपघातात चार जणांचा मृत्यू

संजय महाजन, जळगाव

जळगावमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. भुसावळ तालुक्यातील वरणगाव हद्दीतील महामार्गावर ही घटना घडली. भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे भुसावळ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताचा तपास पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील वरणगाव हद्दीतील महामार्गावर हिरा मारुती मंदिराजवळ ही अपघाताची घटना घडली. दुचाकी आणि कार यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात दुचाकी चालक विजय शंकर काळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर ऐश्वर्या भोसले, विघ्नेश चव्हाण आणि एका वर्षांच्या मोनालीसा चव्हाण या तिघांचा जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्दैवी अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. भुसावळ पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Palghar Accident : बोइसर-चिल्हार महामार्गावर भीषण अपघात; २८ वर्षीय डॉक्टर महिलेचा मृत्यू

पोलिसांनी सांगितले की, दुचाकी चालक विजय शंकर काळे हे मुक्ताईनगरच्या दिशेने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने त्याला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की विजय शंकर काळे यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीवरील अन्य प्रवासी ऐश्वर्या बहादूर भोसले (वय ५० वर्षे), विघ्नेश शंकर चव्हाण (वय १४ वर्षे) आणि मोनालीसा शंकर चव्हाण (वय १ वर्षे) हे गंभीर जखमी झाले होते.

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

जखमींना तातडीने उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे एकाच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. मयतांच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून संबंधित कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची वरणगाव पोलिस ठाण्यात प्रक्रिया सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Accident: मामाच्या गावाकडे जाताना काळाचा घाला, ट्रकच्या चाकाखाली चिरडून १५ वर्षीय मुलीचा मृत्यू
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.