मराठा समाजासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतल आहे. आता ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजालाही अनेक सवलती मिळणार आहेत. या सवलती शैक्षणिक आणि इतर महत्त्वाच्या बाबींबाबत असणार आहेत. मराठा समासाठी तब्बल 8 योजना सुरू केल्या जाणार आहेत. राज्यातील मराठा समाजाच्या लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. सरकारच्या या निर्णयावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हाके नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
महाराष्ट्र फक्त मराठ्यांसाठीच आहे का? – हाकेमराठा समाजासाठी 8 योजना सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यावर बोलताना लक्ष्मण हाके यांनी म्हटले की, ओबीसी समुदायातील योजनांना निधी नाही, ओबीसी महामंडळांना अध्यक्ष नाही. समाज कल्याण विभागाचा हजारो कोटी रुपयांचा निधी इतरत्र वळवला जातो. ओबीसी समुदायातील 18 महामंडळाची घोषणा निवडणुकीला सामोरे जाताना सरकारने केली होती.पण त्या 18 महामंडळाला साधा अध्यक्षही नाही आणि निधी सुद्धा नाही, कार्यालय नाही आणि शिपाई पण नाही. महाराष्ट्र म्हणजे फक्त मराठा समाजासाठीच आहे का?
विद्यार्थ्यांना सवलती मिळत असतील तर स्वागत…महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी विद्यार्थ्यांना काही सवलती देणार असाल तर त्याचं स्वागत लक्ष्मण हाके करणार आहे. पण महा ज्योतीला जो निधी मिळतो तो सार्थीच्या तुलनेत किती मिळतो असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला. आठ लाख करोड रुपयांच्या बजेटमध्ये 50% हुन अधिक जास्त लोकसंख्येला म्हणजे ओबीसीला अर्धा टक्क्याची बजेटची तरतूद असावी. फडणवीस साहेब तुम्ही 12-13 करोड जनतेचे मुख्यमंत्री आहात, परंतु ओबीसींच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता मिळाल्यात. मराठा समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यांना तुम्ही रेड कार्पेट आजही घालता, आम्हाला आजही तुम्ही सापत्न वागणूक देत आहात. आजही तुम्ही एससी एसटी आणि ओबीसी बांधवांवर अन्याय करत आहात, तुमच्या धोरणाचा आम्ही जाहीर निषेध करतो.
मराठा समाजासाठी या योजना सुरू होणार