अभिनय बेर्डेसोबतच्या 'ती सध्या काय करते' सिनेमासाठी आर्या आंबेकरनं दिलेला स्पष्ट नकार, पण...; नेमकं काय घडलेलं?
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क June 06, 2026 10:13 AM

Aarya Ambekar Refused To Work Ti Saddhya Kay Karte: मराठी सिनेसृष्टीतील (Marathi Film Industry) लोकप्रिय गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकर (Actress Aarya Ambekar) अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे. संगीत क्षेत्रात बालवयातच पदार्पण करणाऱ्या आर्याला 'सारेगमप लिटील चॅम्प्स'मुळे (Sa Re Ga Ma Pa Marathi Li'l Champs) नवी ओळख मिळाली. त्यानंतर आर्यानं आजवर अनेक गाजलेली गाणी गायली. त्यानंतर आर्यानं अभिनय क्षेत्रात दमदार पदार्पण केलं आणि सुपरडुपर हिट सिनेमा दिला.  आर्यानं सतीश राजवाडे (Satish Rajwade) यांच्या 'ती सध्या काय करते' (Ti Saddhya Kay Karte Movie) या सिनेमामध्ये काम केलंय. या सिनेमात तिनं लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांचा मुलगा अभिनय बेर्डेसोबत (Abhinay Berde) स्क्रिन शेअर केलेली. या सिनेमातल्या तिनं साकारलेल्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं. याच सिनेमानंतर एक गायिका म्हणून आर्या प्रसिद्ध होतीच, पण एक उत्तम अभिनेत्री म्हणूनही ती नावारुपाला आली. पण, कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल, आर्यानं हिट ठरलेल्या  'ती सध्या काय करते' सिनेमात काम करायला नकार दिलेला. स्वतः आर्यानं याबाबत एका मुलाखतीत बोलताना खुलासा केलाय. 

काही दिवसांपूर्वी आर्या आंबेकरन हिनं 'सर्व काही'युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना आर्या आंबेकरनं अनेक मुद्द्यांवर संवाद साधला. याचवेळी तिनं 'ती सध्या काय करते' सिनेमासाठी विचारणा झाल्यावर स्पष्ट नकार दिलेला, असं म्हटलंय. पण, नंतर दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी समजूत काढली आणि नकाराचं होकारात रुपांतर झालं असंही तिनं सांगितलं.

आर्या आंबेकर नेमकं काय म्हणाली? (Aarya Ambekar On Ti Saddhya Kay Karte Marathi Movie)

गायिका आणि अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेली आर्या आंबेकरनं युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली की, "मी अभिनयाबद्दल कधी विचारच केला नव्हता. सतीश सरांनी जेव्हा मला या सिनेमात काम करण्यासाठी विचारलेलं, तेव्हा मी खरंच त्यांना नाही सांगितलं होतं. कारण, मला माझ्या ॲक्टिंग स्किल्सवरती झिरो कॉन्फिडन्स होता. मी कधी कामच केलं नव्हतं. शिवाय शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही मला कोणी नाटकात वगैरे घेतलं नाही. नेहमी ग्रुप साँग्समध्ये असायचे. त्यामुळे ॲक्टिंग काय असते, कसं करतात, हे मला माहितीच नव्हतं..."

"'ती सध्या काय करते' या सिनेमाच्या शूटच्या पहिल्या दिवशी मला हातात स्क्रिप्टही दिलं नव्हतं. कारण सरांचं असं म्हणणं होतं की, तू जशी आहेस, तू जशी नॅचरल बोलतेय, आम्हाला तसंच हे कॅरेक्टर पाहिजे, त्यामुळे तू अभ्यासच करून येऊ नकोस कशाचाच... जसं तुझ्याकडून नॅचरली प्रत्येक वाक्य बोललं जाईल तसंच आम्हाला तेच पाहिजे.", असं आर्या आंबेकर म्हणाली. 

"मला वाटतं की ही भूमिका माझ्यासाठी सगळ्यात सोपी होती.ज्याच्यासाठी आधी मी खूप घाबरले होते की मला अभिनय वगैरे कसं जमेल. मग मला हे कळलं की, आता मला गाण्यात माहिती आहे की टेन्शन कशाचं घ्यायचं आहे.एखादी तान अवघड असेल तर त्यासाठी मी शंभर वेळा प्रॅक्टिस करेन. इथे मला मुळात अभिनय काय हेच माहिती नाही. त्यामुळे मला कसली भीती वाटायला पाहिजे हेच माहिती नव्हतं. त्यामुळे मी सेटवरची सगळ्यात टेन्शन फ्री व्यक्ती मी होते आणि माझं टेन्शन दिग्दर्शक सतीश सर यांनी घेतलं होतं. सगळं टेन्शन त्यांनी घेतलं आणि त्यांनी जे काही काम त्यांनी माझ्याकडून करून घेतलं याचं सगळं यश हे सतीश सरांचं आहे." अशा आठवणी आर्याने सांगितल्या.

Jai Gidwani Latest Photos: 'शक्ती' सिनेमातल्या करिष्मा कपूरच्या 'त्या' गोंडस मुलानं स्वतःच्या जीवावर उभारलंय कोट्यवधींचं साम्राज्य; 24 वर्षांनी आता दिसतो कसा?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.