पॅरिस: यंदाच्या फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम या टेनिस स्पर्धेमधील महिला एकेरी विभागाला नवा विजेता लाभणार आहे. पोलंडची २४ वर्षीय माजा च्वॉलिंस्का आणि रशियाची १९ वर्षीय मिरा आंद्रिवा यांच्यामध्ये उद्या (ता. ६) अजिंक्यपदाची लढत रंगणार आहे.
या दोन्ही खेळाडू पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचल्या आहेत. पात्रता फेरीमधून फ्रेंच ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी माजा च्वाॅलिंस्का ही पहिलीच टेनिसपटू ठरली आहे, हे विशेष.
CJI SuryaKant: लंडनमध्ये सूर्यकांत यांना विचारला असा प्रश्न की कार्यक्रमच थांबला; भारतीय उच्चायुक्तालयाची तीव्र प्रतिक्रियामाजा च्वॉलिंस्का हिने उपांत्य फेरीच्या लढतीत डायना श्नायडर हिला पराभूत करताना शानदार खेळ साकारला. माजा च्वॉलिंस्का हिने डायना श्नायडर हिला सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले. पहिल्या सेटमध्ये दोन्ही टेनिसपटूंमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळाली.
माजा च्वॉलिंस्का हिने टायब्रेकमध्ये आपला खेळ उंचावला आणि ७-६ असा हा सेट आपल्या नावावर केला. पुढील सेटमध्ये माजा च्वॉलिंस्का हिने ६-४ अशी बाजी मारली. पोलंडच्या टेनिसपटूने दोन तास व दहा मिनिटांमध्ये विजयाला गवसणी घातली.
WTC मधील कसोटींसाठी लय मिळवण्यासाठी महत्त्वाचा सामना; भारत-अफगाणिस्तान यांच्यात आजपासून लढत कोस्तयुकची विजयी मालिका संपुष्टातमिरा आंद्रिवा हिने गुरुवारी युक्रेनच्या मार्ता कोस्तयुक हिच्यावर सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला आणि अंतिम फेरीत धडक मारली. याचसोबत मार्ता कोस्तयुक हिची १७ सामन्यांची विजयी मालिका संपुष्टात आली. मिरा आंद्रिवा हिने ६-१, ६-३ असा विजय साकारला. मार्ता कोस्तयुक हिला एक तास व १६ मिनिटांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. मिरा आंद्रिवा ही २१व्या शतकात फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी तिसरी युवा खेळाडू ठरली आहे. याआधी १७ वर्षीय किम क्लायस्टर्स व १८ वर्षीय कोको गॉफ यांनी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.