Petrol-Diesel-CNG Rate: पश्चिम आशियातील अमेरिका-इराण संघर्षामुळे जागतिक तेलबाजारात अनिश्चितता वाढली असून कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ होत आहे. या तणावाचा परिणाम जागतिक पुरवठा साखळीवरही होत असून भारतातील इंधन दरांबाबत चिंता वाढली आहे. मे महिन्यात अवघ्या 10 दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये चार वेळा वाढ करण्यात आली होती.
दरम्यान, 5 जून 2026 रोजी RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी मौद्रिक धोरण आढाव्यात रेपो दर 5.25 टक्क्यांवर कायम ठेवला. मात्र, पश्चिम आशियातील संघर्ष, वाढत्या कच्च्या तेलाच्या किमती आणि पुरवठा साखळीवरील दबावामुळे महागाईचा धोका वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले. RBI ने चालू आर्थिक वर्षासाठी किरकोळ महागाईचा अंदाज 4.6 टक्क्यांवरून 5.1 टक्क्यांपर्यंत वाढविला आहे. त्यामुळे RBIच्या संकेतानंतर आज पेट्रोल डिझेल चे दर नेमके काय झाले ने जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल आणि डिझेलचे दर6 जून 2026 रोजी देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल आणि डिझेलचे दर खालीलप्रमाणे आहेत.
दिल्ली - पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 95.20 रुपये
मुंबई - पेट्रोल 111.18 रुपये आणि डिझेल 97.83 रुपये
कोलकाता - पेट्रोल 113.47 रुपये, डिझेल 99.82 रुपये
चेन्नई - पेट्रोल 108.01 रुपये, डिझेल 99.66 रुपये
बेंगलुरु - पेट्रोल 110.93 रुपये, डिझेल 98.80 रुपये
महाराष्ट्रातील नवे दर (6 जून 2026)मुंबई - पेट्रोल 111.18 रुपये आणि डिझेल 97.83 रुपये
पुणे - पेट्रोल 112.04 आणि डिझेल 98.68 रुपये
नागपूर - पेट्रोल 111.80 रुपये आणि डिझेल 98.48 रुपये
नाशिक - पेट्रोल 112.44 रुपये आणि डिझेल 99.07 रुपये
कोल्हापूर - पेट्रोल 112.57 रुपये आणि डिझेल 99.23 रुपये
अमरावती - पेट्रोल 112.89 रुपये आणि डिझेल 99.54 रुपये
ठाणे - पेट्रोल 111.38 रुपये आणि डिझेल 98.00 रुपये
25 मे 2026 रोजी झालेल्या चौथ्या दरवाढीनंतर 6 जून 2026 पर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे वाहनधारकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी जागतिक बाजारातील परिस्थिती लक्षात घेता पुढील काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत.
महाराष्ट्रातील CNG दरमुंबई - 86 रुपये प्रति किलो
पुणे - 96.50 रुपये प्रति किलो
नागपूर - 88.90 रुपये प्रति किलो
नाशिक - 93.65 रुपये प्रति किलो
कोल्हापूर - 96.95 रुपये प्रति किलो
ठाणे - 86 रुपये प्रति किलो (आकडेवारी - Goodreturns)