पुणे: नागपूरहून पुण्यातील महत्त्वाच्या व्यावसायिक बैठकीसाठी निघालेले जतीन काळे यांना आझाद हिंद एक्स्प्रेसच्या ११ तासांच्या विलंबामुळे मोठा फटका बसला. काळे यांची बैठक तर चुकलीच, पण त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रासही सहन करावा लागला. हे केवळ एक प्रातिनिधिक उदाहरण असून, हावडा-पुणे मार्गावरील रेल्वेच्या सातत्यपूर्ण विलंबाने हजारो प्रवासी सध्या वेठीस धरले जात आहेत.
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, शेगाव आणि नागपूर या शहरांतून पुण्याला येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या मार्गावर आझाद हिंद एक्स्प्रेस दररोज धावते, तर दुरांतो आणि हमसफर एक्स्प्रेस आठवड्यातून दोनदा धावतात. गेल्या दोन वर्षांपासून या सर्वच रेल्वेंना सरासरी सहा ते आठ तासांचा विलंब होणे नित्याचेच झाले आहे. अनेकदा हावड्यावरून येताना गाडीला प्रचंड उशीर होतो, ज्यामुळे प्रवाशांच्या नियोजित मुलाखती, परीक्षा आणि बैठकांचे वेळापत्रक कोलमडत आहे.
CJI SuryaKant: लंडनमध्ये सूर्यकांत यांना विचारला असा प्रश्न की कार्यक्रमच थांबला; भारतीय उच्चायुक्तालयाची तीव्र प्रतिक्रियारेल्वे प्रशासनाकडून ट्रॅकच्या कामाचे कारण पुढे केले जात असले, तरी हा विलंब कधी थांबणार, असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत. अनेक प्रवाशांना विलंबाची कल्पना नसल्याने ते या गाड्यांचे आरक्षण करतात आणि शेवटी मनस्ताप वाट्याला येतो. या पार्श्वभूमीवर, नागपूरपर्यंतच्या प्रवासासाठी आता अनेक जण पर्यायी रेल्वेंना प्राधान्य देऊ लागले आहेत. आरक्षणाच्या वेळी रेल्वे प्रशासनाने विलंबाची पूर्वसूचना द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
"नागपूरहून पुण्याला येण्यासाठी अतिशय सोयीची वेळ असल्याने मी आझाद हिंद एक्स्प्रेसचे तिकीट आरक्षित केले होते. मात्र, ही रेल्वे नागपूरलाच तब्बल दहा तास उशिरा आली. त्यामुळे नाहक वेळ वाया गेला. पर्यायाने पुण्यात पोहोचण्यासाठी प्रचंड उशीर झाला. यामुळे झालेले नुकसान रेल्वे प्रशासन भरून देणार आहे का?"
- योगिता जामखेडकर, प्रवासी
पोलिस निरीक्षकांना पदोन्नती अन् अंतर्गत बदल्या! सोलापूर शहरातील 4 ‘पीआय’ पदोन्नतीच्या यादीत, तिघांची होणार खांदेपालट; 2 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण"आझाद हिंद एक्स्प्रेसला उशीर होत असल्याने आम्ही स्क्रॅच रेक (मूळ रेल्वेच्या रचनेशी बहुतांशी जुळणारे अतिरिक्त डबे वापरून तयार केलेली एक पर्यायी रेल्वे) तयार केला आहे. उर्वरित गाड्यांच्या बाबतीत मात्र तशी व्यवस्था करणे शक्य नाही. या रेल्वे पुणे विभागात उशिराने दाखल होतात, परिणामी त्यांना पुण्याहून सुटण्यास उशीर होत आहे."
- हेमंत कुमार बेहरा,
जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे