Hai Jawani Toh Ishq Hona Hai Box Office Collection: आठवडाभर चर्चा झाल्यानंतर 'हैं जवानी तो इश्क होना हैं' (Hai Jawani Toh Ishq Hona Hai) या कॉमेडी रोमेंटिक सिनेमाला (Entertainment) प्रेक्षकांची पसंती पाहायला मिळाली. सिनेमागृहात (Box Office Collection) वरुण धवन (Varun Dhavan), मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) आणि पुजा हेगडे (Pooja hegde) यांची प्रमुख भूमिका असलेला 'हैं जवानी तो इश्क होना हैं' या सिनेमानं बॉबी देओलच्या 'बंदर' आणि राम चरण अभिनीत 'पेद्दी' सिनेमाला टक्कर दिली आहे. राम चरणच्या 'पेद्दी' सिनेमाचा साऊथमध्ये जलवा पाहायला मिळत आहे. 'हैं जवानी तो इश्क होना हैं' या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ओपनिंग डेला या सिनेमानं नेमकं किती कोटींचे कलेक्शन केले आहे? जाणून घेऊयात.
डेव्हिड धवन दिग्दर्शित 'हैं जवानी तो इश्क होना हैं' या सिनेमाला पहिल्या दिवशी प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. शुक्रवारी 'बंदर' या सिनेमाव्यतिरिक्त बॉलिवूडचा अजून कोणताही सिनेमा रिलीज झालेला नाही. बॉबी देओल अभिनीत 'बंदर' हा सिनेमा एका वेगळ्याच जॉनरचा आहे. राम चरणचा 'पेद्दी'नं देखील दक्षिणेत उत्तम कामगिरी केली आहे. तरी देखील 'हैं जवानी तो इश्क होना हैं' या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर उत्तम घौडदौड केली आहे.
सिनेमाच्या कलेक्शनबाबत बोलायचं झाल्यास, वरुण धवन स्टारर या सिनेमानं ओपनिंग डेला 7.50 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर सिक्सर मारला आहे. चित्रपटगृहांमध्ये रिलीज झालेला नवीन आणि काही आठवडे जुन्या चित्रपटांची गर्दी असूनही, या सिनेमानं चित्रपटगृहांकडे आकर्षित करण्यात यश मिळवले आहे. दरम्यान, हा सिनेमा या वर्षातील 5वा सर्वात मोठा ओपनिंग करणारा सिनेमा ठरला आहे.
धुरंधर 2 – 145 कोटी
बॉर्डर 2 – 32.1 कोटी
भूत बंगला – 18.31 कोटी
ओ'रोमियो – 9.01 कोटी
'है जवानी तो इश्क होना है- 7.50 कोटी
द राजा साब (हिंदी)-6 कोटी
इक्कीस – 7.28 कोटी
पति पत्नी और वो दो – 4.38 कोटी
मर्दानी 3-4 कोटी
हॅप्पी पटेल-1.25 कोटी
महत्त्वाच्या इतर बातम्या:
राम चरणची जादू चालली; 'पेद्दी'नं बॉक्स ऑफिसला हादरवलं, अवघ्या 2 दिवसांत 90 कोटींचा आकडा पार