Asian Games 2026 : एशियन गेम्ससाठी टीम इंडियाची घोषणा, गोल्ड मेडल जिंकून देणाऱ्या ऋतुराजला वगळलं
GH News June 07, 2026 02:09 AM

बीसीसीआय निवड समितीने 6 जून रोजी आगामी एशियन गेम्स 2026 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. श्रेयस अय्यर या स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तसेच निवड समितीने भारताचा वेगवान आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याला या स्पर्धेसाठी संधी दिली आहे. तसेच मोहम्मद सिराज याचाही समावेश करण्यात आला आहे. सोबतच 15 वर्षांचा स्टार युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याचीही निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

एशियन गेम्ससाठी टीम इंडिया : श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, ईशान किशन, शिवम दुबे, नीतीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.