Father Reveals The Untold Struggles Vaibhav Sooryavanshi: भारतीय संघाला जूनच्या अखेरीस आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे. यासाठी काल ६ जून रोजी टी-२० मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) संघाची घोषणा केली आहे.
यामध्ये आयर्लंड, इंग्लंड आणि आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी संघाची निवड झाली आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघात १५ वर्षीय युवा वैभव सूर्यवंशीची निवड झाली आहे. त्याने या निवडीसह सचिन तेंडुलकरचा विक्रम देखील मोडीत काढला आहे. सचिनची १९८९ मध्ये पाकिस्तान दौऱ्यासाठी १६ वर्षे १८१ दिवस वय असताना भारतीय संघात निवड झाली होती.
"तू नक्की २०० धावा करशील, फक्त..." आयपीएलचा बादशहा बनलेल्या वैभव सूर्यवंशीला ललित मोदींचा सल्ला, तू मोठा सेलिब्रिटी..त्यानंतर १६ वर्षे २०५ दिवस वय असताना सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र आता वैभव सूर्यवंशीने केवळ १५ व्या वर्षी भारतीय संघात स्थान मिळवले आहे. त्यामुळे त्याने आयर्लंड किंवा इंग्लंड दौऱ्यात पदार्पण केले, तर तो सचिनचा सर्वात कमी वयात पदार्पण करण्याचा विक्रमही मोडू शकतो.
परंतु वैभव सूर्यवंशीचा हा प्रवास सोपा नव्हता. संघात निवड झाल्यानंतर त्याचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी स्वप्ने, संघर्ष आणि भरपूर ओरडण्याने भरलेल्या त्या प्रवासातील अनेक न ऐकलेल्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, वैभवने अगदी लहान वयातच क्रिकेटला आपले ध्येय बनवले होते.
ते म्हणाले की, या मुलाने लहानपणापासून खूप मेहनत घेतली आहे. आज त्याला त्याच्या त्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. क्रिकेट हेच त्याचे ध्येय होते आणि तो त्याच दिशेने पुढे जात राहिला. आम्ही त्याच्या पाठीशी उभे आहोत. आज आमचे कुटुंब खूप आनंदी आहे. बिहार आनंदी आहे आणि संपूर्ण देश त्याच्यासाठी आनंदी आहे. वैभवला मिळालेल्या पाठिंब्यामुळे त्याचे कुटुंब भारावून गेले आहे. संजीव म्हणतात की, देशभरातून आपल्या मुलाला मिळणारे प्रेम आणि आशीर्वाद हीच त्यांची सर्वात मोठी संपत्ती आहे.
त्याची प्रतिभा तेव्हाच दिसून आलीवैभवचे वडील सांगतात की लहानपणीच त्यांच्यासमोर त्याच्या प्रतिभेची झलक दिसली होती. ते म्हणाले, "जेव्हा मी लहानपणी त्याच्या हातात बॅट दिली, तेव्हा त्याच्या खेळण्यावरून मला समजले की हा मुलगा काहीतरी खास आहे." हळूहळू त्याच्या सरावासोबत खेळही सुधारत गेला. त्याचा खेळ पाहून आम्हाला वाटले की योग्य मार्गदर्शन आणि कठोर परिश्रम मिळाल्यास तो एक दिवस नक्कीच मोठा खेळाडू बनेल.
त्याला खूप ओरडा खावा लागलासंभाषणादरम्यान वैभवच्या यशाचे रहस्य सांगताना त्याचे वडील म्हणाले की, त्याला खूप ओरडा खावा लागला आहे. त्याने मैदानावरच नाही तर शिस्तीवरही खूप काम केले आहे. तो रात्रंदिवस मेहनत करायचा. कधीकधी त्याच्याकडून चुका व्हायच्या आणि त्याला ओरडा मिळायचा, पण हे सर्व त्याच्या भल्यासाठीच होते. त्याच्या ओरडण्यानेही आजच्या यशात हातभार लावला का, असे विचारल्यावर ते हसत म्हणाले, "त्याचा खूप मोठा हातभार लागला आहे."
Suryakumar Yadav: सूर्या टीम इंडियातून आऊट, पण १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीसाठी केली भावुक पोस्ट; काय म्हणाला वाचा ... मी फक्त वडील नव्हतोसंजीव सूर्यवंशी म्हणाले की क्रिकेटच्या बाबतीत त्यांनी कधीही हलगर्जीपणा केला नाही. ते म्हणाले, "त्याने काही चूक केली तर आम्ही त्याला ओरडायचो, गोष्टी समजावून सांगायचो आणि त्याला सुधारण्याचा प्रयत्न करायचो. त्याला एक चांगला खेळाडू बनवणे हेच आमचे ध्येय होते." हीच कठोरता आज त्याच्यासाठी अभिमानाची बाब बनली आहे. ज्या मुलाला शिस्त लावण्यासाठी ते त्याच्यावर रागावत होते, त्याचीच आता भारतीय संघात निवड झाली आहे, असे वैभव सूर्यवंशीचे वडील म्हणाले.