ब्रीफकेसमध्ये मृतदेह, जंगलात सांगाडा…,15 वर्षीय राधिका सोबत नेमंक काय घडलं? 4 दिवसांमध्ये दडलंय मोठं रहस्य
Tv9 Marathi June 07, 2026 04:45 PM

एक धक्कादायक आणि मन विचलित करणारी घटना समोर आली आहे. अवघ्या 15 वर्षांच्या मुलीची भयानक हत्या करण्यात आली आहे. एवढंच नाही तर, तिचा मृतदेह देखील संशयास्पद परिस्थितीत अडकला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वात आधी तर, मुलीची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिचा मृतदेह एका ब्रीफकेसमध्ये भरण्यात आला आणि जंगलात ब्रीफकेसला आग लावण्यात आली. मृत मुलीची ओळख राधिका म्हणून पटली आहे. राधिका 10 वी इयत्तेत शिकत होती. घडलेल्या या घटनेमुळे परिसरात संतापाचं वातावरण आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक देखील केली असून पुढील तपास सुरु आहे.

4 – 5 दिवसांपासून गायब होती राधिका

मिळालेल्या माहितीनुसार, राधिका गेल्या चार ते पाच दिवसांपासून गायब होती. कुटुंबियांनी राधिकाचा शोध देखील घेतला. पण जेव्हा तिच्याबद्दल कोणतीच माहिती मिळाली नाही, तेव्हा कुटुंबियांनी पोलिसांची मदत घेतली. सुरुवातील बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली. सुरुवातीच्या तपासादरम्यान, पोलीस या प्रकरणाकडे एका बेपत्ता मुलीचं प्रकरण म्हणून पाहत होते, परंतु नंतर तपासादरम्यान धक्कादायक तथ्ये उघडकीस आली.

हत्येनंतर ब्रीफकेसमध्ये ठेवला मृतदेह

प्राथमिक तपासात असं उघड झालं आहे की, आरोपीने आधी राधिका हिची हत्या केली आणि नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह एका ब्रीफकेसमध्ये बंद केला. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने मृतदेह मोटरसायकलवरून वनक्षेत्रात नेला. तिथे त्याने तिची ओळख मिटवण्यासाठी मृतदेह जाळून टाकला. ही धक्कादायक घटना पंजाब याठिकाणी घडली आहे.

जंगलात आढळला सांगाडा…

प्रकरणाचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा, जंगलातून एक सांगाडा जप्त करण्यात आला. घटनास्थळावरून मिळालेले पुरावे आणि संशयास्पद हालचालींच्या आधारे पोलिसांनी तपास केला. तपासादरम्यान, आरोपीच्या हालचालींवर संशय आल्याने त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीतून महत्त्वपूर्ण माहिती समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी भाड्याच्या घरात राहत असून त्याची सतत चौकशी सुरू आहे. हत्येमागील हेतू सध्या अस्पष्ट आहे. पोलीस अद्याप याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.