‘टायटन’ला घराघरात पोहोचवणाऱ्या माणसाची कथा म्हणजे ‘मेड इन इंडिया: द टायटन स्टोरी’. यात जेआरडी टाटा यांच्या पाठिंब्याने उद्योजक झरक्सेस देसाई यांच्या धाडसी प्रवासाचं चित्रण करण्यात आलं आहे. त्यांनी 1980 च्या दशकात भारताचा पहिला जागतिक दर्जाचा स्वदेशी घड्याळ ब्रँड शून्यातून उभा केला.
या कथेची सुरुवात तेव्हा होते, जेव्हा जेआरडी टाटा यांना एका स्विस घड्याळ निर्मात्यांकडून अपमानकारक अनुभवाला सामोरं जावं लागतं. त्यानंतर ते टाटा कंपनीचे अत्यंत आश्वासक आणि महत्त्वाकांक्षी कार्यकारी अधिकारी झरक्सेस देसाई यांच्यावर स्वदेशी घड्याळ तयार करण्याचं काम सोपवतात. या वेब सीरिजमध्ये नसीरुद्दीन शाह यांनी जेआरडी टाटा आणि जिम सर्भने झेरक्स देसाई यांची भूमिका साकारली आहे. 3 जूनपासून ही सीरिज एमएक्स प्लेयरवर स्ट्रीम होत आहे.