आपल्या दैनंदिन जीवनात वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी वास्तुचे नियम पाळणे फायदेशीर ठरते. या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास जीवनात नकारात्मकता येऊ शकते.
अनेकांना हातामध्ये घड्याळ घालण्याची आवड असते, परंतु घड्याळ घालताना होणाऱ्या काही लहान चुका तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा आणू शकतात. वास्तुशास्त्रानुसार घड्याळ घालताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, याबद्दल आज आपण माहिती घेऊया.
घड्याळ घालताना त्याचा पट्टा (Strap) तुमच्या मनगटावर व्यवस्थित बसेल याची काळजी घ्या. खूप सैल किंवा जास्त घट्ट पट्टा असल्यामुळे शारीरिक अस्वस्थता तर होतेच, शिवाय कामावर लक्ष केंद्रित करण्यातही अडथळे येतात.
तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणत्याही हातावर घड्याळ घालू शकता. परंतु, वास्तुशास्त्रानुसार उजव्या हाताच्या मनगटावर घड्याळ घालणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे तुमची कामे जलद गतीने आणि सहजतेने पूर्ण होण्यास मदत होते.
अनेक लोकांना रात्री झोपताना घड्याळ काढून उशीखाली ठेवण्याची सवय असते. वास्तुशास्त्रानुसार ही मोठी चूक आहे. उशीखाली घड्याळ ठेवून झोपल्याने जीवनात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि रात्रीची शांत झोप मिळण्यातही अडचणी येतात. त्यामुळे झोपताना घड्याळ नेहमी बाजूला टेबलवर किंवा योग्य ठिकाणी ठेवावे.