मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत ड्रग्जविरोधातील कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरही भाष्य केले. जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थिती आणि त्याचा पुरवठा साखळीवर झालेला परिणाम यामुळे देशात इंधनाच्या किमती वाढल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्य सरकार विविध विषयांवर लक्ष ठेवून आवश्यक ती पावले उचलत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Buldhana Water Crisis: खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी बुलढाण्यात दाखल; पाणीटंचाईवर मोठा दिलासाबुलढाणा शहरात सुरू असलेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अखेर खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी शहरात दाखल झाले आहे. या पाण्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आज सकाळी पाणी येळगाव जलाशयात पोहोचल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. पाणीपुरवठा सुरळीत आणि प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.
Chikhali News : चिखलीत 'स्टिकफास्ट'च्या नशेविरोधात व्यापाऱ्याचा पुढाकार; विक्री कायमस्वरूपी बंदतरुण पिढी नशेच्या आहारी जाऊ नये, यासाठी चिखली येथील 'नितीन एम्पोरियम'चे संचालक गोपाल लड्ढा व त्यांचे पुत्र नितीन लड्ढा यांनी आपल्या दुकानातून 'स्टिकफास्ट' ट्युबची विक्री कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. काही तरुणांकडून या उत्पादनाचा नशेसाठी गैरवापर होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हा सामाजिक निर्णय घेतला.
Nanded News : विजेच्या खांबाचा शॉक लागून ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यूविद्युत पोलचा शॉक लागल्याने सात वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. नांदेड शहरातील हमेदिया कॉलनी मधील हे घटना घडली.आदिल पठाण असे या मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आह. आदिला सायंकाळी खेळण्यासाठी घराबाहेर पडला होता.
Sharad Pawar : हेच सरकारचं महागाई नियंत्रणाचं सूत्र; गॅस दरवाढीवरून शरद पवारांचा टोलाशरद पवार यांनी गॅस दरवाढीवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, देशात गॅसचे दर सातत्यानं वाढत आहेत. आजही घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढवण्यात आलेत. सरकारचे महागाई नियंत्रण म्हणजे जनतेला टप्प्या टप्प्याने झटके देणे असंच सूत्र आहे.
Navneet Rana Live: नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी नाहीनवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी नाही
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी स्पष्ट करून सांगितले
सुनेत्रा पवार यांच्या नंतर रिक्त झालेल्या राज्यसभा जागेचा मुद्दा
नवनीत राणा राष्ट्रवादी काँग्रेस कडून राज्यसभेवरती जाणार अशी होती चर्चा
नवनीत राणा हा विषय राष्ट्रवादी कडून संपलेला आहे
Buldhana Live: बुलढाणा पोलिसांचा जागतिक सायकल दिनानिमित्त पुढाकार'संडे ऑन सायकल' उपक्रमातून फिटनेसचा संदेश...
बुलढाणा पोलिसांचा जागतिक सायकल दिनानिमित्त पुढाकार
Marathi Film Festival: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळासाठी आज मतदानराज्यभर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळासाठी आज मतदान
तब्बल नऊ वर्षानंतर होत असलेल्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष
राज्यभरातील 3 हजार 403 पात्र सभासद मतदानाचा हक्क बजावणार
17 जागांपैकी तीन जागा बिनविरोध झालेले आहेत
समर्थ पॅनल विरुद्ध चित्रकार मी पॅनल अशी निवडणूक होते
Solapur : शक्तीपीठ महामार्गाविरोधात गाव बंदशक्तीपीठ मार्गाला सोलापूर जिल्ह्यात मोठा विरोध वाढू लागला आहे. आज पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे गाव बंद ठेवून विरोध केला. येथील शेतकऱ्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत रोष व्यक्त केला. येथील बाजारपेठ बंद ठेवल्याने गावातील व्यवहार ठप्प झाले.
Sangli News : अवकाळी पावसाचं थैमान, वाळव्यात पीकं भुईसपाटपरवा सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने सांगलीच्या वाळवा तालुक्यातील वारणा पट्ट्यातील ऊस व भाजीपाला शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. मुसळधार पाऊस, सुसाट्याचा वारा आणि विजांच्या गडगडाटासह आलेल्या पावसाने ऊस पिके अक्षरशः भुईसपाट झाली असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
Baramati Live : बारामतीत कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांची हतबलता; ट्रकभर कांदा मेंढ्यांना चारा म्हणूनकांद्याला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने आणि कांदा साठवण्याची सोय नसल्यामुळे अनेक शेतकरी पीक शेतातच टाकून देण्याचा पर्याय स्वीकारत आहेत. कष्टाने पिकवलेला कांदा मातीमोल ठरत असल्याने शेतकऱ्यांवर मोठे नुकसान सहन करण्याची वेळ आली आहे.
दरम्यान, बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे परिसरात कांद्याच्या दरघटीचे गंभीर चित्र समोर आले आहे. चाऱ्याच्या टंचाईमुळे एका मेंढपाळाने तब्बल ७०० मेंढ्यांसाठी ट्रकभर कांदा चारा म्हणून वापरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कांद्याचा प्रश्न आणि चाऱ्याची कमतरता या दुहेरी संकटांचा फटका सध्या शेतकऱ्यांना बसत आहे.
Live : मान्सूनचा विमानसेवेवर परिणाम; सोलापूर-गोवा आणि सोलापूर-हैदराबाद उड्डाणे ऑगस्टपर्यंत स्थगितमान्सूनमुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल हवामानाचा फटका सोलापूर विमानसेवेला बसला आहे. फ्लाय 91 कंपनीने सोलापूर-गोवा आणि सोलापूर-हैदराबाद या विमानसेवा तात्पुरत्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 19 जूनपासून या दोन्ही मार्गांवरील तिकीट विक्रीही थांबवण्यात आली आहे.
पावसाळ्यात कमी दृश्यमानता तसेच सोलापूर विमानतळावर नाइट लँडिंगची सुविधा नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सोलापूर-गोवा आणि सोलापूर-हैदराबाद या विमानसेवा किमान दोन ते तीन महिन्यांसाठी, म्हणजेच ऑगस्टपर्यंत स्थगित राहण्याची शक्यता आहे.
Live : इंदापूरच्या म्हसोबाचीवाडीत धाडसी घरफोडी; 44.90 लाखांचा ऐवज लंपासइंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एका घरात घरफोडी करत सुमारे 44 लाख 90 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भगवान नांदगुडे यांनी भिगवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी घराच्या बेडरूमची लोखंडी ग्रील तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटे, फ्रीज आणि सुटकेसची झडती घेत सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू तसेच 1 लाख 90 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. चोरी झालेल्या ऐवजात सुमारे 27 तोळे सोन्याचे दागिने आणि 1 किलो चांदीच्या वस्तूंचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
Delhi Live : दिग्विजय सिंह यांची पंतप्रधान मोदींना त्रि-भाषा धोरणाची अंमलबजावणी स्थगित करण्याची विनंतीकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून, चालू शैक्षणिक सत्राच्या मध्यातच सीबीएसई (CBSE) द्वारे नववीच्या विद्यार्थ्यांसाठी त्रि-भाषा धोरण अनिवार्यपणे लागू करण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे आणि ही अंमलबजावणी स्थगित करण्याची विनंती केली आहे.
Abhijit Dipake Live : अभिजीत दिपके यांचे छत्रपती संभाजीनगरात आगमन; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तकॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आज पहाटे छत्रपती संभाजीनगरात दाखल झाले. अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर त्यांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. आंदोलन संपल्यानंतर ते थेट वाळूज महानगर येथील आपल्या निवासस्थानी पोहोचले.
Delhi Live : 'आयडीएफसी फर्स्ट बँक-एयू फायनान्स बँक' फसवणूक प्रकरणात सीबीआयचे ६ ठिकाणी छापेहरियाणा आणि चंदीगड सरकारच्या निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी, ६६१ कोटी रुपयांच्या 'आयडीएफसी फर्स्ट बँक-एयू फायनान्स बँक' फसवणूक प्रकरणात सीबीआयने सहा ठिकाणी छापे टाकले आहेत.
Kerala Live : राष्ट्रीय पुरस्कार विजेते मल्याळम अभिनेते सलीम कुमार यांचे वयाच्या ५६ व्या वर्षी निधनराष्ट्रीय पुरस्कार विजेते मल्याळम अभिनेते सलीम कुमार यांचे वयाच्या ५६ व्या वर्षी निधन झाले. केंद्रीय मंत्री सुरेश गोपी रुग्णालयात दाखल झाले आहेत. आरोग्याच्या समस्यांमुळे अभिनेते सलीम कुमार यांना शनिवारी कोचीमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.