पुणे: जिल्ह्यात शुक्रवार (ता. ५) तसेच शनिवारी (ता.६) वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे हिरवं स्वप्न उद्ध्वस्त झाले.वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाल्याने संसार उघड्यावर पडले. उभी पिके जमीनदोस्त झाली, तसेच बहुतांश ठिकाणी झाडे उन्मळून पडली.
ऊस, कांदा तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले. सध्या पिकांना बाजारभाव मिळत नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये पावसामुळे भर पडली.पिंपरे खुर्द (ता. पुरंदर) परिसरात शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने मोठे नुकसान केले. अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले आहेत. जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून त्वरित नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.
Pune: पाच हजार नागरिकांचे घराचे स्वप्न प्रतीक्षेत; दहा हजारांपेक्षा जास्त अर्ज; घरांची संख्या मर्यादितचवाऱ्याचा वेग इतका वाढला की, अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली. काही घरांवरील पत्रे आणि कौले उडाली तर शेतातील आणि रस्त्यालगतची झाडे कोसळल्याने नागरिकांची धावपळ उडाली. दरम्यान, आज (ता. ६) वाल्हे मंडळ अधिकारी बापूसाहेब देवकर, तलाठी पल्लवी नराळे आणि पोलिस पाटील रूपाली सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचे पंचनामे करण्यात आले.
यावेळी सरपंच राजेंद्र गायकवाड, मनोज गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते. पिंपरेतील उमेश थोपटे, शामल सुरेश थोपटे व उमेश गायकवाड यांच्या घरावरील कौले उडाली तर पुष्पा रवींद्र धुमाळ, गोविंद विठ्ठल थोपटे, मुकुट साहेबराव थोपटे व विजय दगडू लेंभे यांच्या घरावरील पत्रे उडून गेली. चंद्रकांत बुवासाहेब थोपटे यांच्या घरावर वादळी वाऱ्याने लोखंडी शेड येऊन आदळल्याने दोन खोल्यांचे नुकसान झाले. तसेच जनावरांना पत्र्यामुळे गंभीर जखमा झाल्या. दादा शितोळे, एकनाथ बाबूराव थोपटे यांच्या घरावर लिंबाचे झाड पडल्याने घराची भिंत कोसळली.
Petrol Diesel Price Today : एलपीजी दरवाढीनंतर पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या महाग झाले की स्वस्त? मुलींच्या प्रसंगावधानाने टळली दुर्घटनापिंपरे खुर्द येथील रुक्साना रसुल सय्यद यांच्या घरावर वादळी वाऱ्यात मोठे झाड कोसळल्याने घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. झाड पडताना झालेल्या मोठ्या आवाजाने घरातील दोन्ही अल्पवयीन मुलींनी तत्काळ घराबाहेर धाव घेतल्याने त्यांचा जीव वाचला. या घटनेत घरातील संसारोपयोगी साहित्य पावसात भिजून मोठे नुकसान झाले असून या महिलेचा संसार अक्षरशः उघड्यावर आला आहे.
दीडशेहून अधिक कोंबड्यांचा मृत्यूपिंपरे खुर्द येथील रुक्साना रसुल सय्यद यांच्या घरावर मोठे झाड कोसळल्याने त्यांचे राहते घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. सुदैवाने घरातील दोन्ही अल्पवयीन मुलींनी वेळीच बाहेर धाव घेतल्याने अनर्थ टळला. इक्बाल मुबारक शेख यांच्या कुक्कुटपालन शेडचे पत्रे उडून गेल्याने दीडशेहून अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाला.
दृष्टिक्षेपातवादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीजवाहिन्या तुटल्या
परिसरातील वीजपुरवठा खंडित
अनेक कुटुंबांपुढे निवाऱ्याचा प्रश्न निर्माण
दुचाकी व चारचाकी वाहनांवर झाडे पडल्याने नुकसान