मुंबई : मध्य रेल्वेच्या आसनगाव ते कसारादरम्यान ओव्हरहेड वायरच्या (ओएचई) कामासाठी मंगळवार (ता. ९) आणि बुधवारी (ता. १०) कसारा मार्गावर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. दुपारी ३.५० ते सायंकाळी ५.५० या वेळेत खर्डी आणि थळ घाट रिव्हर्सल केबिनदरम्यान डाऊन मार्गावर हा ब्लॉक राहणार आहे.
ब्लॉककालावधीत आसनगाव ते कसाऱ्यादरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नसल्याने अनेक लोकल गाड्या आसनगावपर्यंतच चालविण्यात येणार आहेत. सीएसएमटीहून दुपारी १.१०, २.१७आणि २.४६ वाजता सुटणाऱ्या कसारा लोकल गाड्या आसनगाव ची येथेच अर्ध्यावर थांबतील. तसेच कसाऱ्याहून सीएसएमटीकडे येणाऱ्या दुपारी ३.३५, ४.१६ आणि ५.०२ वाजताच्या लोकल गाड्या आसनगाव येथूनच सुरू होतील.
ब्लॉकपूर्वी सीएसएमटीहून कसाऱ्यासाठी शेवटची लोकल दुपारी १२.३० वाजता सुटेल. तर कसाऱ्याहून सीएसएमटीकडे शेवटची लोकल दुपारी २.४२ वाजता धावेल. ब्लॉकनंतर सीएसएमटीहून कसाऱ्यासाठी पहिली लोकल सायंकाळी ४.५० वाजता, तर कसाऱ्याहून सीएसएमटीकडे पहिली लोकल सायंकाळी ६.१७वाजता सुटेल.
Mumbai: मुंबईतील रुग्णांसाठी खुशखबर! आता कमी दरात औषधं मिळणार; जेनेरिकसोबत ब्रँडेड औषधांवरही सवलत एक्स्प्रेस गाड्यांवर परिणामया ब्लॉकमुळे एलटीटी-बलिया कामायनी एक्स्प्रेस दोन्ही दिवशी दीड तास उशिराने, म्हणजे दुपारी ३.३० वाजता सुटणार आहे. एलटीटी-राजगीर एक्स्प्रेस, सीएसएमटी-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, पनवेल-गोरखपूर एक्स्प्रेस आणि राजधानी एक्स्प्रेसचे विविध स्थानकांवर नियमन करण्यात येणार आहे.
काही गाड्यांना विलंबएलटीटी-प्रतापगड उद्योगनगरी एक्स्प्रेस (ता. ९) तसेच सीएसएमटी-बल्हारशाह नंदिग्राम एक्स्प्रेसला दोन्ही दिवशी १० ते १५ मिनिटांचा विलंब होण्याची शक्यता असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे.
ब्लॉकमुळे मुंबईकडील चार गाड्या उशिरानेमध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील टिकेकरवाडी यार्ड येथे आधुनिकीकरणाचे काम आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी १० जूनपर्यंत विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येत आहे. या नॉन-इंटरलॉकिंग कामामुळे मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईहून सुटणाऱ्या काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार असून, काही गाड्यांचे नियमन करण्यात येणार आहे.
Mumbai News : केबल चोरीच्या प्रयत्नाने सिग्नल यंत्रणा ठप्प; पनवेल-वाशी मार्गावरील लोकल सेवा दोन तास विस्कळित; सायंकाळच्या गर्दीत हजारो प्रवासी अडकले मुंबई मडगावदरम्यान एकतर्फी ट्रेनप्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते मडगावदरम्यान १४ जून २०२६ रोजी एकतर्फी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०११७३ ही विशेष ट्रेन रविवारी (ता. १४) दुपारी ११.३० वाजता सीएसएमटी येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे १.३० वाजता मडगाव येथे पोहोचेल.
या ट्रेनला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी येथे थांबे देण्यात आले आहेत. या विशेष ट्रेनमध्ये तीन वातानुकूलित चेअर कार, १० सेकंड क्लास चेअर कार (त्यापैकी सहा आरक्षित आणि ४ अनारक्षित), एक सेकंड क्लास सीटिंग कोचसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार डबे आहेत.