वीकेंडला मुंबई-पुणे एक्सप्रेसवे जाम! वाहनांच्या लांबच लांब रांगा; महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी
esakal June 07, 2026 10:45 PM

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. कामशेत, कार्ला फाटा, मळवली तसेच लोणावळ्यातील विविध भागांत वाहनांच्या तीन ते चार किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग अत्यंत मंदावल्याने पर्यटक, भाविक आणि स्थानिक नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

रविवारची सुट्टी आणि उन्हाळी सुट्ट्यांचा शेवटचा टप्पा यामुळे लोणावळा परिसरात पर्यटक आणि भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. तसेच कार्ला येथील प्रसिद्ध आई एकवीरा देवी मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. त्यामुळी ही वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची मोठी कोंडी; दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा..

याठिकाणी विविध भागांत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी ही रांग तब्बल तीन ते चार किलोमीटरपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. वाहतुकीचा वेग अत्यंत मंदावल्याने प्रवाशांना अडकून राहावे लागते आहे.

Pune Bangalore Highway Traffic : पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; बावधन येथे अवजड वाहन बंद पडल्याने १० किमीपर्यंत रांग

सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आलेले पर्यटक आणि देवीच्या दर्शनासाठी आलेले भाविक या दोघांनाही या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला. अनेक कुटुंबे लहान मुलांसह वाहनांमध्ये अडकून पडली आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाच वातावरण आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.