-जमील पठाण
कायगाव : धार्मिक विधी करून घरातील संकटे दूर करू आणि पतीचे दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याची खोटी भीती घालून कर्नाटकातील गाणगापूरच्या एका भोंदूबाबाने 26 वर्षीय विवाहितेची 5 लाख रुपयांची फसवणूक केली. व्हॉट्सअँप ग्रुपद्वारे ओळख करून 3 महिने मानसिक छळ करणाऱ्या या आरोपीसह त्याच्या साथीदारांविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Cycling Story: ६० वर्षांपासून रोज सायकल चालवणारे पांडुरंग शिर्के; सहा वेळा सायकलवरून पंढरपूर वारी, आजही विनाऔषध तंदुरुस्तफिर्यादी सोनाली बाळासाहेब तागड, वय 26, रा. शिराळ चिचुंडी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर. सध्या भेंडाळा फाटा, (ता. गंगापूर) येथे वास्तव्यास आहेत. मार्च 2026 मध्ये पतीच्या मोबाइलवरील व्हॉट्सअँप ग्रुपद्वारे त्यांची ओळख कमलाकर जोशी, वय 50, रा. गाणगापूर, कर्नाटक याच्याशी झाली.
सुरुवातीला सोनाली यांनी घरगुती अडचणी सांगितल्या. याच गैरफायदा घेत जोशीने विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने फोन करून सांगितले की, "तुमच्या घरात मोठ्या अडचणी आहेत. पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध आहेत. हे थांबवायचे असेल तर होम-हवन विधी आणि ग्रहदोष निवारण करणे अनिवार्य आहे."
अशी झाली फसवणूकभीतीपोटी सोनाली यांनी 10 मार्च ते 1 जून 2026 या कालावधीत आरोपीला टप्प्याटप्प्याने पैसे दिले. भोंदूच्या सांगण्यावरून त्यांनी 23.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने 2 लाख 35 हजार रुपये किमतीचे आणि 7 हजार रुपये रोख आरोपीच्या साथीदारांना दिले. तर उर्वरित 2 लाख 58 हजार रुपये फोन पे आणि बँक खात्याद्वारे आरोपीच्या खात्यात ट्रान्सफर केले.
विधी पूर्ण झाल्यानंतरही कोणताही फरक न पडल्याने सोनाली यांना संशय आला. चौकशीअंती आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
Success Story: अंगणवाडी सेविकेच्या तिन्ही मुलांची सरकारी सेवेत भरारी; एक मंत्रालयात, दोघे मुंबई पोलिसांत, शेतकरी कुटुंबाची प्रेरणादायी यशोगाथा आरोपीचा शोध सुरूयाप्रकरणी कमलाकर जोशी, त्याचा मुलगा आणि इतर दोन अनोळखी इसमांविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. 6 )जून रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे एक पथक आरोपीच्या शोधार्थ कर्नाटकातील गाणगापूर येथे दाखल झाले आहे.तेथे पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
सपोनि झांजुर्णे म्हणाले, "फोनवर, व्हॉट्सअँपवर घरगुती समस्या सोडवतो म्हणून कोणी पैशांची मागणी करत असेल तर तात्काळ 112 वर कॉल करा. श्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्या भोंदूंपासून सावध रहा."