-ऋत्विक जाधव, तांत्रिक विश्लेषक
भारतीय शेअर बाजारात सध्या क्षेत्रानुसार बदल (Sector Rotation) स्पष्टपणे दिसून येत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ‘निफ्टी आयटी’ निर्देशांक अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरत असताना, ‘निफ्टी फार्मा’ निर्देशांकाने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. मजबूत तांत्रिक रचना, स्थिर व्यवसाय मॉडेल आणि बचावात्मक स्वरूप यामुळे औषधनिर्माण अर्थात फार्मा क्षेत्र पुढील काही वर्षांसाठी आकर्षक गुंतवणूक पर्याय ठरू शकते.
Cycling Story: ६० वर्षांपासून रोज सायकल चालवणारे पांडुरंग शिर्के; सहा वेळा सायकलवरून पंढरपूर वारी, आजही विनाऔषध तंदुरुस्ततांत्रिक विश्लेषण
तांत्रिक विश्लेषणानुसार, ‘निफ्टी फार्मा’ निर्देशांकाने २०२३ च्या सुरुवातीपासून ते २०२४ च्या अखेरपर्यंत दमदार तेजी नोंदवली. या कालावधीत निर्देशांक सुमारे १२ हजार अंशांच्या पातळीवरून २४ हजार अंशांपर्यंत पोहोचला. ही जवळपास १०० टक्क्यांची वाढ असून, चार्टवर एक मजबूत पोल तयार झालेला दिसतो. या तेजीनंतर निर्देशांकाने नफावसुली आणि वितरण टप्प्यात प्रवेश केला. एप्रिल २०२६ पर्यंत सुरू असलेल्या या कन्सॉलिडेशनमुळे बाजारातील अतिरिक्त उत्साह कमी झाला आणि निर्देशांकाने पुढील मोठ्या हालचालीसाठी मजबूत पाया तयार केला. अलीकडेच ‘निफ्टी फार्मा’ने या फ्लॅग पॅटर्नमधून निर्णायक ब्रेकआउट दिला आहे. ब्रेकआउटनंतर सध्या निर्देशांक पुन्हा मागे येत असून, हा टप्पा तांत्रिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अशा प्रकारच्या ‘रिट्रेसमेंट’मध्ये दीर्घकालीन गुंतवणूकदारांना योग्य भावावर प्रवेश करण्याची संधी मिळते. सध्या ‘निफ्टी फार्मा’साठी २४,००० ते २४,५०० अंशांची पातळी महत्त्वाचा सपोर्ट झोन म्हणून उदयास आली आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक संधी ठरू शकते.
भारत हा ‘फार्मसी ऑफ द वर्ल्ड’ म्हणून ओळखला जात असून, वाढता आरोग्य खर्च, आरोग्य विम्याचा वाढता प्रसार, जनरिक औषधांची जागतिक मागणी, स्पेशालिटी औषधांमधील संधी यामुळे भारतीय फार्मा उद्योगासाठी दीर्घकालीन वाढीची क्षमता मजबूत आहे. याशिवाय, हे बचावात्मक क्षेत्र असल्यामुळे बाजारातील अनिश्चिततेच्या काळात संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कल या क्षेत्राकडे वाढतो. आयटी क्षेत्रावरील दबाव कायम राहिल्यास काही प्रमाणात निधी फार्मा क्षेत्राकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तांत्रिक ब्रेकआउट, मजबूत मूलभूत घटक आणि बचावात्मक स्वरूप या तिन्ही घटकांचा विचार करता, ‘निफ्टी फार्मा’ निर्देशांक पुढील काळात बाजारातील आघाडीच्या क्षेत्रांपैकी एक ठरू शकतो.
Success Story: अंगणवाडी सेविकेच्या तिन्ही मुलांची सरकारी सेवेत भरारी; एक मंत्रालयात, दोघे मुंबई पोलिसांत, शेतकरी कुटुंबाची प्रेरणादायी यशोगाथा(डिस्क्लेमर ः वरील शिफारस पूर्णपणे तांत्रिक विश्लेषणावर आधारित आहे, जी भविष्यातील भावाच्या हालचालीचा अंदाज लावण्याचा एक प्रकारचा वैज्ञानिक मार्ग आहे. सर्व गुंतवणूकदारांनी इक्विटी गुंतवणुकीतील जोखमींबद्दल योग्य माहिती घ्यावी. माझे यात
कोणतेही वैयक्तिक हितसंबंध नाहीत आणि यामध्ये माझी गुंतवणूक नाही. मात्र, आमच्या ग्राहकांची काही गुंतवणूक असू शकते.)