मुल्लानपूर कसोटीत टीम इंडियाचा विक्रमी विजय! अफगाणिस्तान तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि 300 धावांनी पराभूत
Marathi June 08, 2026 07:25 PM

भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात न्यू चंदीगड, मुल्लानपूरमधील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर एकमेव कसोटी सामना खेळला गेला, ज्याचा निकाल तिसऱ्याच दिवशी लागला. 6 जूनपासून खेळल्या गेलेल्या या अविस्मरणीय कसोटी सामन्याचा शेवट भारताच्या विजयाने झाला. भारताने हा सामना एका डाव आणि 300 धावांनी जिंकला. हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला आहे. या सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या मानव सुथारने लक्षवेधी कामगिरी केली. त्याने अफगाणिस्तानच्या पहिल्या डावात 6 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आणि तोच या सामन्याचा सामनावीर ठरला.

या सामन्यात भारताचा कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये केएल राहुल आणि गिल यांनी शतके, ऋषभ पंत आणि साई सुदर्शन यांनी अर्धशतके केली. त्यामुळे भारताने पहिल्याच डावात 564 धावसंख्येचा डोंगर रचला. प्रत्युत्तरात अफगाणिस्ताचा पहिला डाव 152 धावसंख्येवरच संपुष्टात आला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.