INDW vs WIW : टीम इंडिया चाचणी परीक्षेत पास, वर्ल्ड कपआधी विंडीजवर सराव सामन्यात 26 धावांनी विजय
GH News June 09, 2026 03:09 AM

आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 12 जूनपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत 12 जून ते 5 जुलै दरम्यान एकूण 12 संघात 33 टी 20i सामने खेळवण्यात येणार आहे. त्याआधी 6 ते 10 जून दरम्यान 12 सराव सामने खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने सराव सामन्यात विजय मिळवला आहे. वुमन्स टीम इंडियाने सराव सामन्यात वेस्ट इंडिजवर 26 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने वेस्ट इंडिजसमोर 180 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 153 धावा करता आल्या.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.