लहान मुलांच्या डाएटमध्ये ‘हे’ मासे हवेच
Marathi June 10, 2026 07:25 AM

मांसाहारात अंडी, चिकन, मटनापेक्षा मासे हे सर्वात जास्त हेल्दी फूड मानले जाते. माशात प्रोटीन, ओमेगा-३ फॅटी अॅसिड, व्हिटामीन डी, व्हिटामीन बी १२ सह अनेक पौष्टीक घटक असतात. जे लहान मुलांच्या शारिरीर व मानसिक विकासासाठी आवश्यक असतात. यामुळे मुलांच्या डाएटमध्ये माशांचा समावेश करण्याचा सल्ला मांसाहारींना दिला जातो.

पण माशांमध्ये काटे असल्याने बरेच पालक मुलांना मासे देणे टाळतात. मुलांच्या घशात काटा अडकेल अशी भीती त्यांना असते. त्यामुळे मुलांना चिकन, मटन सूप उकडलेली अंडी खाण्यास दिली जातात. पण माशांचे असेही काही प्रकार आहेत ज्यात काटे जवळजवळ नसतातच किंवा असले तरी ते काढून टाकणे सहज शक्य असते. कोणते आहेत हे मासे ते बघूया.

रावस-जगातील सगळ्यात हेल्दी माशांमध्ये रावसचा समावेश होतो. यात ओमेगा ३ फॅटी अॅसिडचे प्रमाण भरपूर असते. ज्यामुळे मुलांचा बौद्धीक विकास वेगाने होतो. तसेच दृष्टी आणि स्मरणशक्तीही तीक्ष्ण होते. यात काटेही कमी असतात. त्यामुळे मुल रावस सहज खाऊ शकतात.

शिळा-बासा हा मासा चवीला हलका आणि याचे मांसही नरम असते. यात काटेही कमी असतात. त्यामुळे लहान मुलांना हा मासा खायलाही आवडतो. यात प्रोटीनचे मुबलक प्रमाण असल्याने मुलांचे स्नायू बळकट होतात. हा मासा फ्राय किंवा त्याचे कालवण अथवा फिश फिंगर्स बनवून खाऊ शकता.

तिलापिया- हा आफ्रिकन मासा आहे. यात प्रोटीन, व्हिटामीन डी, व्हिटामीन बी १२ आणि ओंमेगा ३ फॅटी अॅसिडचे मुबलक प्रमाण असते. त्यामुळे मुलांचा शारिरीक व बौध्धीक विकासासाठी हा मासा फायदेशीर ठरतो. यात लहान काटे असल्याने शिजवल्ायनंतर ते सहज काढता येतात.

कॉड-हा मासा प्रामुख्याने समुद्राच्या तळाशी राहतो. हे मासे आकाराने चपटे असतात. चवीला अतिशय चविष्ट आणि मऊ असल्यामुळे किनारपट्टीच्या भागात, विशेषतः कोकणी आणि गोवन पद्धतीचे फिश फ्राय आणि कालवण बनवण्यासाठी हे मासे खूप लोकप्रिय आहेत. फॅट कमी असते त्यामुळे हा मासा सहज पचतो. व्हिटामीन डी, व्हिटामीन बी १२ सेलेनियम यासारखे पौष्टीक घटक यात असतात. त्यामुळे मुलांच्या शाररिक विकासासाठी, हाडे बळकट होण्यासाठी हा मासा मुलांना खाण्यास देतात.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.