TV Actress Sanchita Ugale: टेलिव्हिजनवरची सुप्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगले (TV Actress Sanchita Ugale) हिनं आत्महत्या केलीय. अवघ्या 30 वर्षांची हिंदी मालिकाविश्वात प्रसिद्ध असलेली संचिता उगले (Sanchita Ugale) हिनं राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केलीय. संचिता उगले आपले आई-वडील आणि 15 वर्षांच्या बहिणीसोबत नालासोपारा (Nalasopara News) इथे राहत होती. रविवारी संध्याकाळी घरात कोणीच नसताना संचितानं साडीच्या सहाय्यानं बेडरुममधल्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केलीय. तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं, पण त्यापूर्वीच तिनं हे जग सोडलं होतं. संचितानं असं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे मनोरंजन विश्व पुरतं हादरलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, संचिता उगले या 30 वर्षांच्या अभिनेत्रीनं रविवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केलीय. बेडरूममधल्या पंख्याला गळफास घेऊन संचिता उगले हिनं आत्महत्या केलीय. आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नसलं तरीसुद्धा गेल्या काही महिन्यांपासून तिला काम मिळत नव्हतं. त्यामुळे ती काही दिवसांपासून नैराश्यात होती. त्यातूनच तिनं आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. आचोळे पोलीस सध्या या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री संचिता उगाले आपले आई-वडील आणि बहिणीसोबत नालासोपाऱ्यातील परिसरात राहत होती. घरी एकटी असतानाच संचितानं टोकाचं पाऊल उचललं. संचितानं राहत्या घरात साडीनं गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. घटनास्थळी सुसाईड नोट सापडली नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं असून सध्या पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये, सिनेमांमध्ये झळकलेली संचिता उगले (Sanchita Ugale TV Serials)
'कुमकुम भाग्य' मालिकेत संचिता उगले हिनं दिया टंडन ही भूमिका साकारलेली. 'दिलवाले दुल्हे ले जायेगी...' या मालिकेत तिनं सुकून ही मुख्य भूमिका साकारलेली. 'वागले की दुनिया' मालिकेत तिनं रुचिता जैतली ही भूमिका साकारलेली. छावा सिनेमात तिनं महाराणी ताराराणींची तिनं भूमिका साकारलेली. सायलेन्स 2 सिनेमातही तिनं महत्त्वाची भूमिका साकारलेली.
पाहा व्हिडीओ : Sanchita Ugale Died : टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री संचिता उगलेने जीवन संपवलं...
ABP Majha च्या बातम्या LIVE