मुंबई : नुकत्याच झालेल्या गारपिटीसह बिगरमोसमी पाऊस अन् वादळी वाऱ्यामुळे राज्यातील शेतीला जोरदार फटका बसला असून, ५६ हजार ५३३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या अहवालानुसार, या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील २४ जिल्ह्यांतील फळबागा, भाजीपाला आणि विविध हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Success Story: जुन्नरच्या सिद्धीने गाठले आकाश! अवघ्या २०व्या वर्षी अमेरिकेतून कमर्शियल पायलट बनण्याचा मान, सिद्धी हाडवळेची प्रेरणादायी यशोगाथा..राज्य शासनाच्या अहवालानुसार राज्यात १ मे ते ८ जून २०२६ या कालावधीत राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा तडाखा बसला. जून महिन्याच्या सुरुवातीपासून म्हणजे १ जून ते ८ जून या आठ दिवसांच्या कालावधीतच १० जिल्ह्यांमध्ये १७ हजार ९३२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. तर मे महिन्यात सर्वाधिक ४० हजार २१५ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे.
जळगाव, बुलडाणा, सोलापूर आणि अकोला या जिल्ह्यांना बिगरमोसमी पावसाचा जास्त फटका बसला आहे. या भागात वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात केळी,मका, कांदा, टरबूज, कलिंगड, भाजीपाला, डाळिंब, संत्रा, द्राक्ष आणि आंबा या पिकांचा समावेश आहे.
Cycling Story: ६० वर्षांपासून रोज सायकल चालवणारे पांडुरंग शिर्के; सहा वेळा सायकलवरून पंढरपूर वारी, आजही विनाऔषध तंदुरुस्तकेळी, द्राक्ष आणि डाळिंब यांसारख्या नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. त्याचबरोबर आंबा आणि संत्री उत्पादकांनाही बिगरमोसमी पावसाचा फटका बसला आहे. दरम्यान, महसूल, कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त क्षेत्रांचे पंचनामे सुरू असून अंतिम अहवालानंतर नुकसानभरपाईचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.