US vs Iran : ट्रम्प का नाही खवळणार? साध्या ड्रोनने अपाचेला पाडावं, इराणने हात वर केले, म्हणतात आमचा..
GH News June 10, 2026 11:11 AM

मध्य पूर्वेतील आधीपासूनच तणावपूर्ण असलेली परिस्थिती आणखी चिघळली आहे. यावेळी कारण ठरलय अपाचे हेलिकॉप्टरवरील हल्ला. स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमध्ये आधीपासून अमेरिका आणि इराणकडून परस्परांवर हल्ले, गोळीबार अशा घटना ब्रेक घेत सुरु आहेत. अपाचे हे अमेरिकी सैन्य दलाचं सर्वात अत्याधुनिक हेलिकॉप्टर आहे. हॉर्मुजमध्ये मंगळवारी अपाचे हेलिकॉप्टर पाडण्यात आल्याचं समजल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प खवळले. त्यांनी थेट इराणवर हल्ल्याचे आदेश दिले. त्यानंतर अमेरिकन सैन्याने इराणमध्ये मोठी कारवाई केली. इराणने देखील प्रत्युत्तराची कारवाई केली आहे. अमेरिकेने इराणवर अपाचे हेलिकॉप्टर पाडण्याचा आरोप केला आहे. पण इराणने हा आरोप फेटाळून लावलाय. अमेरिकेने आमच्यावर हल्ला करण्यासाठी कारण शोधलय असा इराणचा दावा आहे.

हॉर्मुजमध्ये अपाचे हेलिकॉप्टरवर इराणने हल्ला केलेला नाही असं इराणचे उप परराष्ट्र मंत्री मजीद रवांची यांनी अल जजीरा या परदेशी मीडियाशी बोलताना सांगितलं. मागच्या 24 तासात हॉर्मुजमध्ये कुठलीही आक्रमक हवाई सैन्य मोहिम राबवलेली नाही असं इराणच्या सरकारी मीडियाने सैन्य सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे. अपाचे हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेच्या आडून शत्रू पुन्हा शुत्रत्व सुरु करतोय. याला आम्ही निर्णायक उत्तर देऊ असं इराणने म्हटलं आहे.

त्यांनी इथून निघून जाणं हाच चांगला पर्याय

हेलिकॉप्टर कोसळलं असलं तरी अपाचेमधील दोन्ही वैमानिकांना कुठलीही दुखापत झालेली नाही. अमेरिका या हल्ल्याला उत्तर देईल असं ट्रम्प म्हणाले होते. इराणी ड्रोनने अपाचे हेलिकॉप्टर पाडल्याचा अमेरिकी अधिकाऱ्याने दावा केला आहे. इराणचे परराष्ट मंत्री अब्बास अराघची यांनी या घटनेवर थेट कुठलीही टिप्पणी केलेली नाही. पण सोशल मीडियावर लिहिलय की, ‘धोका कमी करण्यासाठी त्यांनी इथून निघून जाणचं चांगला पर्याय आहे’

उत्तर हे मजबूत आणि जबरदस्त असलं पाहिजे

ट्रम्प यांच्या धमकीनंतर काहीवेळातच इराणवर अमेरिकी हल्ले सुरु झाले. “त्यांनी आमचं एक हेलिकॉप्टर पाडलं. आम्ही आता त्याचं उत्तर देत आहोत. उत्तर हे मजबूत आणि जबरदस्त असलं पाहिजे आणि ते तसचं आहे” असं ट्रम्प म्हणाले.इराणच्या सरकारी मीडियानुसार, हॉर्मुजमध्ये केशम बेटावर हल्ला झाला आहे.इराणी वृत्तसंस्थेनुसार, होर्मोजगनच्या पूर्वेकडच्या भागात स्फोटाचे आवाज ऐकू आले आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.