जयपूर
राजस्थानची राजधानी जयपूरच्या जगतपुरा भागात एका फटाक्यांच्या कारखान्याला मंगळवारी भीषण आग लागली. या आगीत होरपळून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक गंभीर जखमी झाले असून त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आग लागण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.