धायरी : नवले पुलाखाली सोमवारी रात्री सुमारे १२.४५ वाजता भीषण अपघात घडला. कात्रज बायपास रस्त्यावरून सिमेंटने भरलेला दहा टायर टँकर भरधाव वेगाने येत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर नवले पुलाखाली पलटी झाला.
Success Story: जुन्नरच्या सिद्धीने गाठले आकाश! अवघ्या २०व्या वर्षी अमेरिकेतून कमर्शियल पायलट बनण्याचा मान, सिद्धी हाडवळेची प्रेरणादायी यशोगाथा..याच दरम्यान रस्त्यावरून जात असलेली दुचाकी टँकरखाली अडकली. या दुर्घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मृताची ओळख रामेश्वर मच्छिंद्र उगले (वय ३१, सध्या रा. कात्रज, मूळ रा. फुलसांगवी, बीड) अशी झाली आहे.
अपघातानंतर मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पीएमआरडीए व पुणे महापालिका अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्य सुरू केले. पलटी झालेला टँकर रस्त्यावरून हटवण्यासाठी तीन क्रेनच्या सहाय्याने दीर्घ प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर काही वेळातच वाहतूक सुरळीत करण्यात आली.
दरम्यान, नऱ्हे पोलीस स्टेशन, सिंहगड पोलीस स्टेशन आणि सिंहगड रोड पोलीस स्टेशन व सिंहगड रोड वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणून पंचनामा केला.
Cycling Story: ६० वर्षांपासून रोज सायकल चालवणारे पांडुरंग शिर्के; सहा वेळा सायकलवरून पंढरपूर वारी, आजही विनाऔषध तंदुरुस्तअपघातग्रस्त टँकर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या भीषण अपघातामुळे नवले पुल परिसरातील अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्याची मागणी पुन्हा एकदा नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.