Sushant Divgikar On Becoming Rani Kohenur: प्रसिद्ध अभिनेता (Actor) आणि मॉडेल (Model) सुशांत दिवगीकर (Sushant Divgikar) यानं पुरुष ते स्त्री असा लिंगबदल (ट्रान्झिशन) केलंय. सुशांत आता त्याची ओळख, 'राणी को-हे-नूर' (Rani Ko-He-Nur) अशी आहे. राणी आपल्या नव्या ओळखीमुळे खूपच आनंदी आहे. जरी तिचा जन्म मुलगा म्हणून झाला होता, तरी तिला नेहमीच स्त्री बनायची खूप इच्छा होती, त्यामुळेच सुशांतचा ट्रान्झिशन करुन राणी झाल्याचंही तो सांगतो. सामाजिक दबाव आणि टोमणे यांची पर्वा न करता त्यानं लिंगबदलाचं आपलं स्वप्न पूर्ण केलंय. आता त्याची ओळख राणी अशीच आहे. आज ती एक ट्रान्सजेंडर महिला म्हणून आनंदानं जीवन जगतेय, असंही सुशांतचा राणी बनलेली मॉडल सांगते.
पुरुष ते स्त्री असा प्रवास (Sushant Divgikar Becoming Rani Kohenur)
राणी को-हे-नूर अलिकडेच स्टँड-अप कॉमेडियन आणि 'बिग बॉस' फेम प्रणीत मोरे याच्या शोमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी तिनं प्रणीत मोरेसोबत गप्पा मारल्या. त्यावेळी तिनं सोशल मीडियावरील 'ट्रोलिंग'च्या (ऑनलाइन टीकेच्या) मुद्द्यावर चर्चा केली. जेव्हा प्रणीतनं तिला विचारलं की, ती 'राणी' कशी बनली? तेव्हा तिनं उत्तर दिलं की, "माझा जन्म मुलगा म्हणून झालेला. पण आयुष्य एकदाच मिळतं, त्यामुळे मनाला जे वाटेल तेच केलं पाहिजे..."
View this post on Instagram
प्रणीतनं पुढे बोलताना म्हणाला की, तू सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. त्यानं विचारलं की, याचा तिच्यावर काही परिणाम होतो का? त्यावर राणीनं उत्तर दिलं की, "नाही, मी खूप निवांत (Chill) असते. मी वांद्रे इथे राहते, मला काहीच कल्पना नसते की कोण, कुठल्या गटारातून आणि कोणाच्या वाय-फायचा वापर करून मला मेसेज पाठवतंय..."
दरम्यान, प्रणीत मोरेनं त्याच्या ऑफिशिअल इन्स्टा हँडलवरुन राणीसोबतच्या संभाषणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. राणीच्या स्पष्टवक्तेपणाची आणि आत्मविश्वासपूर्ण उत्तराची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
ट्रोलिंगवर काय म्हणाली राणी? (Rani Kohenur Trolled)
राणी को-हे-नूर म्हणाली की, "लोक अनेकदा आमच्या समुदायाला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करतात. पण, मला असं वाटतं की, जे लोक स्वतःच्या लैंगिकतेबाबत (Sexuality) समाधानी आणि स्पष्ट आहेत, ते इतरांना ट्रोल करत नाहीत. लोक जाहीरपणे कमेंट्समध्ये शिवीगाळ करतात आणि नंतर खाजगी संदेश (DMs) पाठवतात. हे पाहून मला प्रश्न पडतो की, त्यांच्या मनात नक्की काय चाललंय. मग माझ्या लक्षात आलंय की, त्यांना स्वतःबद्दलच खात्री नसते. राणी पुढे म्हणाली की, "मी मुलगा आहे की मुलगी... याचा इतरांना काय फरक पडतो?"
दरम्यान, सुशांत दिवगीकरपासून 'राणी को-ही-नूर' (Rani Ko-HE-Nur) असा प्रवास केल्यानंतर, ती आता आपल्या अटींवर आयुष्य जगतेय. ती आयुष्यात खूप चांगली कामगिरी करतेय आणि तिचा चाहतावर्गही मोठा आहे.
ABP Majha च्या बातम्या LIVE :